धक्कादायक! कोरोना बाधित महिलेवर डॉक्टराकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न

माधव इतबारे
Wednesday, 3 March 2021

मंगळवारी रात्री येथे ड्युटीवर असलेल्या एका डॉक्टराने या महिलेसोबत लगड करत अतिप्रसंग प्रयत्न केल्याने महिलेने त्याला विरोध करीत आरडाओरड केली

औरंगाबाद: महापालिकेच्या पदमपुरा येथील कोविड केअर सेंटरमध्ये एका महिला रुग्णावर डॉक्टरांकडूनच अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रशासनाने चौकशी सुरू केली असून, गुरुवारी (ता.चार) दुपारपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिकेचे प्रशासन तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी दिले आहेत. 

महापालिकेच्या पदमपुरा येथील कोविड केअर सेंटरमध्ये दोन दिवसापूर्वी एक महिला रुग्ण दाखल झाली होती. मंगळवारी रात्री येथे ड्युटीवर असलेल्या एका डॉक्टराने या महिलेसोबत लगड करत बलात्काराचा प्रयत्न केल्याने महिलेने त्याला विरोध करीत आरडाओरड केली.

औरंगाबादकरांसाठी धोक्याची घंटा! 24 तासांत 371 जणांना कोरोनाची लागण तर 7...

त्यानंतर कोविड केअर सेंटरमध्ये एकच गोंधळ उडाला. इतर कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मध्यस्थी केली. दरम्यान सकाळी या प्रकाराची प्रशासनाने गंभीरपणे दखल घेत चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडे यांनी सदर घटनेचा चौकशी अहवाल मागविण्यात आल्याचे सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad breaking news Excessive attempts by a doctor on a woman infected with corona