esakal | वैजापूर तालुक्यात गॅसचा स्फोट होऊन संसारोपयोगी साहित्य जळून खाक, महिला होरपळून जखमी 
sakal

बोलून बातमी शोधा

Vaijapur Gas Explosion News

घरातील सोनेचांदीचे दागिने, रोख चाळीस हजार रुपये दहा क्विंटल गहु, आधार कार्ड, राशन कार्ड, बँक पासबुक, संसारोपयोगी साहित्य मिळुन दोन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.

वैजापूर तालुक्यात गॅसचा स्फोट होऊन संसारोपयोगी साहित्य जळून खाक, महिला होरपळून जखमी 

sakal_logo
By
रमेश राऊत

शिऊर (जि.औरंगाबाद) : निमगाव (ता.वैजापुर) येथील अण्णासाहेब येडू गायकवाड यांच्या घरातील गॅसचा स्फोट होऊन त्यात त्यांची आई चंद्रकलाबाई येडूबा गायकवाड (वय ६५ ) या होरपळून जखमी झाल्या आहेत. गायकवाड कुटुंबीय हे निमगाव शिवारातील शेत गट क्रमांक ८७ या शेतवस्तीवर राहतात. नेहमी प्रमाणे सोमवारी (ता.पाच) रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास स्वयंपाक करून शेजारील वस्तीवर गेले असता थोड्याच वेळात अचानक गॅस टाकीचा स्फोट होऊन परिसरात मोठा आवाज झाला. या घटनेत पत्र्याचे घर जळाले.

'माझ्यावरील कारवाईसाठी मागणी करणारे शिवसेना-भाजपाचे नेते आता कुठे?

घरातील सोनेचांदीचे दागिने, रोख चाळीस हजार रुपये दहा क्विंटल गहु, आधार कार्ड, राशन कार्ड, बँक पासबुक, संसारोपयोगी साहित्य मिळुन दोन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. घरात बांधलेली शेळी होरपळून ठार झाली. चंद्रकलाबाई या बकरी सोडण्याच्या प्रयत्नात असतांना त्याही जखमी झाल्या असून सदर महिलेस औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती पोलिस पाटील शिवाजी सीताराम गायकवाड यांनी तलाठी युसूफ पठाण यांना कळविली. त्यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे. 

संपादन - गणेश पिटेकर