esakal | आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी घंटानाद

बोलून बातमी शोधा

ghantanad}

२९ जानेवारीपासून मुंबई येथील आझाद मैदानात राज्यातील विनाअनुदानित शिक्षक विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत

आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी घंटानाद
sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद: शाळा अनुदानासाठी २९ जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी (ता. चार) सर्व शाळांमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाकडून घंटानाद करण्यात आले.

२९ जानेवारीपासून मुंबई येथील आझाद मैदानात राज्यातील विनाअनुदानित शिक्षक विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी (ता.चार) शाळेतच घंटानाद करण्यात आले.

धक्कादायक! कोरोना बाधित महिलेवर डॉक्टराकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न

पुंडलिकनगर येथील वंदे मातरम शाळेमध्ये घंटानाद आंदोलनाप्रसंगी विजय गव्हाणे, एस. पी. जवळकर, वाल्मिक सुरासे, प्रा. मनोज पाटील, शिवाजी बनकर पाटील, मुख्तार कादरी, राजीव वाघ, सलीम मिर्झा बेग, शेख मन्सूर, महेश उबाळे, महेश पाटील, आनंद खरात, प्रदीप पवार, विजय द्वारकुंडे,यांच्यासह शिक्षकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.