esakal | Gram Panchayat Election: नवनिर्वाचित सदस्यांची कोरोना चाचणीसाठी गर्दी; अहवालांची प्रतिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

gp election

सरपंच, उपसरपंच निवडीसाठी सभागृहात हजर राहता यावे यासाठी कोरोनाची चाचणी बंधनकारक केली आहे

Gram Panchayat Election: नवनिर्वाचित सदस्यांची कोरोना चाचणीसाठी गर्दी; अहवालांची प्रतिक्षा

sakal_logo
By
ईश्वर इंगळे

सोयगाव (औरंगाबाद): सरपंच, उपसरपंच निवडीसाठी सभागृहात हजर राहता यावे यासाठी कोरोनाची चाचणी बंधनकारक केली आहे. त्यामुळे शुक्रवारी नवनिर्वाचित सदस्यांनी थेट रुग्णालयात जाऊन कोरोना चाचण्या केल्या. शुक्रवारी 168 सदस्यांचे कोरोना तपासणी नमुने औरंगाबादला पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

सोयगाव तालुक्यात या आधी 54 सदस्यांचे नमुने पाठविण्यात आले होते. त्यामध्ये १५ जणांचे अहवाल नकारात्मक आढळल्याने या सदस्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार 8 तारखेला होणाऱ्या सरपंच, उपसरपंच निवडीच्या बैठकीसाठी कोरोना तपासणी प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे.

दुर्दैवी! ऊसतोड कामगारांना घेऊन चाललेला ट्रॅक्टर 40 फूट खोल नदीत कोसळला

कोरोनाच्या टेस्टचा अहवाल असल्याशिवाय सभागृहात प्रवेश करता येणार नाही. त्यामुळे शुक्रवारी 168 सदस्यांनी कोरोना तपासण्या करून घेतल्या होत्या. यामध्ये सोयगाव ग्रामीण रुग्णालयात डॉ.केतन काळे यांनी 51 कोविड नमुने घेतले असून ग्रामीण भागातून सावळदबारा-23, बनोटी-62 आणि जरंडी-27 याप्रमाणे कोरोना नमुने तपासणीसाठी घेण्यात येऊन औरंगाबादला पाठविण्यात आले आहे.

(edited by- pramod sarawale)