
तसेच या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल न झाल्यास २६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा जलील यांनी दिला
औरंगाबाद: जालना रोडवरील वक्फ बोर्डाच्या जागेची विक्री करून शंभर कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
जालना रोडवरील औरंगाबाद वक्फ बोर्डाच्या जागेवर अवैधरित्या अतिक्रमण करून बेकायदेशीर व नियमबाह्य बांधकाम करून जवळपास शंभर कोटी रुपयांचा महाघोटाळा केल्याचा आरोप शनिवारी खासदार जलील यांनी केला. या घोटाळ्यात अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणाऱ्या वक्फ बोर्ड, महापालिका, रजिस्ट्री ऑफिस तसेच टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.
'राज्य सरकार विरोधात ७ फेब्रुवारी पासून एल्गार मेळावा'
तसेच या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल न झाल्यास २६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा जलील यांनी दिला. दरम्यान वक्फ बोर्डाच्या जागेचे विक्री होत नसल्याने काही बड्या धनसेठयांनी अधिकाऱ्यांना लाखों रुपये देऊन नियमबाह्य कामे केली असल्याचे ते म्हणाले.
Corona Impact: कोरोना, इंधन दरवाढीनं ट्रान्सपोर्ट व्यवसाय डबघाईला
दरम्यान हे प्रकरण न्यायालयात गेले असून न्यायालयाने येथे बांधकामावर स्थगिती दिली आहे. तरीही येथे नियमबाह्य शॉपिंग कॉम्प्लेक्सचे काम सुरू असल्याचे जलील म्हणाले. या प्रकरणाची गृहमंत्री अनिल देशमुख यांना माहीत दिली असून देशमुख यांनी उच्चत्तम चौकशीचे आदेश देण्याचे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
(edited by- pramod sarawale)