esakal | औरंगाबादमध्ये मनसेने सहाय्यक आयुक्तांच्या टेबलावर टाकल्या गुटख्याच्या पुड्या
sakal

बोलून बातमी शोधा

manase

संबंधितावर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

औरंगाबादमध्ये मनसेने सहाय्यक आयुक्तांच्या टेबलावर टाकल्या गुटख्याच्या पुड्या

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: राज्यात गुटखा बंदी असूनही जिल्ह्यात सर्रासपणे विक्री सुरु आहे. याबाबत मनसेने आज अन्न व औषधी प्रशासन विभागाला निवेदन दिले. संबंधितावर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सहाय्यक आयुक्तांच्या टेबलावरच गुटख्याच्या पुड्या टाकून निषेध व्यक्त केला.

सहाय्यक आयुक्त मिलिंद शहा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, परराज्यातून येणारा गुटखा तसेच तंबाखूजन्य साहित्य जिल्ह्यातील पान टपऱ्या, होलसेल टोबॅको विक्री करणारी दुकाने यासह विविध हातगाड्यांवर आढळून येत आहे. परिणामी शहरातील युवक, नागरिक सर्रासपणे हा गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थ खाऊन शहरातील विविध ठिकाणे घाण करत आहे. याकडे तातडीने लक्ष देऊन अन्न व औषधी प्रशासन विभागाने कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी मनसेने केली आहे.

धक्कादायक घटना! अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, विभाग अध्यक्ष अशोक पवार, शहर सचिव संतोष कुटे, किशोर साळवे, विभाग अध्यक्ष चंदू नवपुते, कामगार सेनेचे सचिव बाबुराव जाधव, परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष उमेश दीक्षित, महिला सेनेच्या रीना राठोड, मनीषा गवारे, विभाग अध्यक्ष विकी जाधव, अभय मांजरमकर, चित्रपट सेनेचे जिल्हाध्यक्ष युवराज गवई, प्रदीप पाटील यांची उपस्थिती होती.

(edited by- pramod sarawale)