
१४ जिल्ह्यांत १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान राबविण्यात आले
औरंगाबाद: आयोध्येतील राम मंदिरासाठी मराठवाडा आणि खानदेशातील १४ जिल्ह्यांतून ४५ कोटींच्या निधीचे संकलन झाले आहे. श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियाना अंतर्गत या निधीचे संकलन करण्यात आले असल्याची माहिती देवगिरी प्रांत अभियान प्रमुख अप्पा बारगजे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या जिल्ह्यांत १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान राबविण्यात आले. हे अभियान सर्व स्तरातील जनतेपर्यंत पोचले. त्यामध्ये शेतकरी, कामगार, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, नोकर व महिला पुरुष यांनी या अभियानात सहभाग घेतला होता, अशी माहितीही बारगजे यांनी दिली.
कौतुकास्पद! खेड्यातील मुलीच्या यशाने जळवकरांची छाती अभिमानाने फुलली; साक्षी...
या अभियानात १ लाख ६० हजार ६८३ सेवकांनी तसेच विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला होता. या अभियानांतर्गत ३३ लाख ६६ हजार ६०३ कुटुंबांची संपर्क साधण्यात आला. १४ जिल्ह्यांतील ११ हजार ३४४ गावांपैकी अकरा हजार २३२ गावापर्यंत आणि शहरातील एकूण १०६२ त्यांपैकी २०५६ वस्त्या पर्यंत रामभक्त पोहोचले. संकलित झालेल्या ४५ कोटी ६ लाख २५ हजार ३०५ रुपयांचा निधी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र यांच्याकडे सुपूर्त केला जाणार आहे, असेही बारगजे यांनी सांगितले. यावेळी जनार्धन महाराज मेटे, सुनील चावरे, केतन पगारे, राजू जहागिरदार उपस्थित होते