esakal | मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर आता मंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath shinde

भविष्यातील महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून बऱ्याच शिवसेनेच्या नेत्यांनी औरंगाबादचे दौरे केले आहेत

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर आता मंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे आज औरंगाबाद शहराच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शिंदे हे औरंगाबाद शहरात महापालिकेच्या माध्यमातून सुरु असलेल्या विकास कामांचा आढावा घेणार आहेत. काही दिवसांपुर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचा दौरा केला होता.

सध्या महापालिकेत या आढावा बैठकीची सुरुवात झाली असून या बैठकीला मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाठ, आमदार प्रदीप जैस्वाल उपस्थित आहेत.

"दिल्ली, नोएडा पाठोपाठ आता औरंगाबाद शहरात चार्जिंग सेंटर' 

महापालिकेत होत असलेल्या या बैठकीत नगरविकास मंत्री सध्या शहरात सुरु असलेल्या विकास कामांचा आढावा घेणार आहेत. ही बैठक संपल्यानंतर दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार असून या बैठकीत नगरपंचायत आणि नगरपरिषद अंतर्गत विकास नियंत्रण नियमावली अंमलबजावणी बैठक तसेच विकास कामांचा आढावा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत.