औरंगाबाद- नगर रस्त्यावर नातेवाईकाकडे निघालेल्या दुचाकीस जोरदार धडक; महिला ठार, एक गंभीर जखमी

दीपक जोशी
Sunday, 31 January 2021

वाळूजनजीकच्या बजाजनगरात राहणाऱ्या नातेवाईकांना भेटण्यासाठी शेंदुरवादानजीकच्या भगतवाडी भागातील लक्ष्मण लंघे व मथुराबाई कडुबाळ सुकासे हे दुचाकीवर (एमएच २० सीझेड ६०२६) जात होते.

लिंबेजळगाव (जि.औरंगाबाद) : पुण्याहून शहराकडे जाणाऱ्या भरधाव कारने बजाजनगरातील नातेवाईकाकडे निघालेल्या दुचाकीस्वारास जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील महिला ठार, तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. सदरची घटना औरंगाबाद अहमदनगर  मुख्य रस्त्यावरील जिकठाण फाट्यानजीक (ता.गंगापूर) येथे रविवार (ता.३१) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे.

घर अवघ्या काही अंतरावर असतानाच काळाने घातला घाला, तरुणाचा अपघातात जागीच मृत्यू

या विषयी मिळालेली माहीती की, वाळूजनजीकच्या बजाजनगरात राहणाऱ्या नातेवाईकांना भेटण्यासाठी शेंदुरवादानजीकच्या भगतवाडी भागातील लक्ष्मण लंघे व मथुराबाई कडुबाळ सुकासे हे दुचाकीवर (एमएच २० सीझेड ६०२६) जात होते. त्यांची दुचाकी जिकठाण फाट्याजवळ येताच पाठीमागून पुणे येथून औरंगाबादकडे भरधाव वेगात येणाऱ्या कारने (एमएच १२ केवाय ९७९१) दुचाकीला जोराची धडक दिली. दुचाकीला धडक बसताच कारने पलट्या घेऊन रस्त्याच्या बाजुला जाऊन थाबंली. घटनेचे वृत्त समजताच नागरिकांच्या मदतीने वाळूज पोलिसांनी दुचाकीवरील दोघांनाही औरंगाबाद येथील घाटी दवाखान्यात दाखल केले. त्या ठिकाणी तपासून मथुराबाई सुकासे यांना मृत घोषित करण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या लक्ष्मण लंघे यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

गतिरोधकामुळे रोजच अपघात
लिंबेजळगाव येथील एका गतिरोधकवर नगरकडुन जोरदार येणारे वाहन ब्रेक लावत असल्याने त्याच्या आवाजाने दुकानदार घाबरत आहेत. याच ठिकाणी वाहने जोरदार ब्रेक लावत असल्याने रोजच लहान-मोठे अपघात घडत आहे. पुढेच तुर्काबाद फाटा असल्याने वाहने सरळ रस्त्यावर येतात. त्यामुळे येथेही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Breaking News Woman Died In Accident, Man Injured Bajajnagar