औरंगाबाद शहरात किरकोळ कारणावरून तरुणावर गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 January 2021

रस्त्याच्या कारणावरून भंगार दुकानावर काम करणाऱ्या तरुणाने ३१ वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला केला

औरंगाबाद: किरकोळ कारणावरून एकाने गावठी कट्ट्यातून गोळीबार करत तरुणावर प्राणघातक हल्ला केला. ही खळबळजनक घटना गुरुवारी (ता.२८) रात्री उशिरा शहरातील बुढ्ढीलेन भागात घडली.

रस्त्याच्या कारणावरून भंगार दुकानावर काम करणाऱ्या तरुणाने ३१ वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला केला. अब्दुल जब्बार अब्दुल सत्तार असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर संशयित अक्रम खान शेर खान (रा. बारुदगर नाला परिसर) याने गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडल्या. त्यानंतर तो पसार झाला.

Gram Panchayat Election: औरंगाबाद तालुक्यातील 114 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे...

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अक्रमने जब्बारच्या दिशेने तीन राऊंड फायर केले. त्यापैकी दोन चुकल्या तर तिसरी गोळी जब्बारच्या पायात घुसली. त्याला जखमी अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला होता. रात्री उशिरापर्यंत पोलिसांचे शोधकार्य सुरूच होते. 

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad breaking news Young man shot last night in city