esakal | Corona Update : औरंगाबादेत कोरोनामुळे आज आठ जणांचा मृत्यू, एकूण बळींची संख्या पोहचली २४६ वर
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

शहरातील पाच व ग्रामीण भागातील तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील तीन पुरुष व पाच महिला  आहेत.

Corona Update : औरंगाबादेत कोरोनामुळे आज आठ जणांचा मृत्यू, एकूण बळींची संख्या पोहचली २४६ वर

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असून मृत्यूतही सातत्याने वाढ होत आहे. शहरातील पाच व ग्रामीण भागातील तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील तीन पुरुष व पाच महिला  आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २४६ बळी कोरोना आणि इतर व्याधींनी गेले आहेत. अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. 

१) सिटीचौक येथील ७५ वर्षीय पुरुष रुग्णाला २७ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याच दिवशी सकाळी दहाच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना उच्च रक्तदाबही होता.  

२) गल्ले बोरगाव (ता. खुलताबाद) येथील ६० वर्षीय महिलेला २६ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्‍यांचा कोरोना चाचणी त्याच दिवशी पॉझिटीव्ह आला. त्यांचा २७ जूनला सायंकाळी दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब व हृदयविकार होता.   

३) सादतनगर येथील ५९ वर्षीय पुरुषाला २६ जूनला घाटी रुग्णालयात घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांचा २३ जूनलाच कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचा २७ जूनला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मृत्यू झाला. 

४) वैजापुर येथील ६५ वर्षीय महिलेला २४ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांचा २४ जूनलाच कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचा २७ जूनला सायंकाळी रात्री आठच्या सुमारास मृत्यू झाला. 

५) रामकृष्णनगर येथील ७२ वर्षीय महिलेला १९ जूनला घाटी रुग्णालयात घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांचा त्याच दिवशी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचा २७ जूनला रात्री दहाच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांना डायबेटीज मेलीटीस, उच्च रक्तदाब होता.

६) शिवुर (ता. वैजापुर) येथील ६० वर्षीय महिलेला २२ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांचा २१ जूनलाच कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचा २८ जूनला सकाळी नऊच्या सुमारास मृत्यू झाला.

७) आंबेडकरनगर, सिडको एन-सात येथील ७० वर्षीय पुरुषाला २६ जूनला घाटी रुग्णालयात घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांचा २७ जूनला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचा २८ जूनला सकाळी साडे अकराच्या सुमारास मृत्यू झाला. 

८) सिल्लेखाना, क्रांतीचौक येथील ६० वर्षीय महिलेला आठ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांचा नऊ  जूनला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचा २८ जूनला सकाळी साडे अकराच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाबही होता.