औरंगाबादेत आणखी पाच रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 April 2020

औरंगाबाद शहरात जिल्हा सामान्य रुग्णालयात ४, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २ तर १ रुग्णांवर खासगी हॉस्पीटल मध्ये उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक सुंदर कुलकर्णी यांनी ‘सकाळ’ शी बोलतांना दिली. 

औरंगाबाद:  शहरात २१ वर्षीय तरुण आणि ४५ वर्षीय गृहीणाला कोरोनाची लागण झाल्यानंतर रविवार (ता.५) शहरातील पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने शहरातील कोरोनाचा धोका वाढला आहे. सध्या औरंगाबाद शहरात जिल्हा सामान्य रुग्णालयात ४, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २ तर एका रुग्णांवर खासगी हॉस्पीटल मध्ये उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक सुंदर कुलकर्णी यांनी ‘सकाळ’ शी बोलतांना दिली.

हेही वाचा- कोंबलेल्या मजूरांची सुटका आणखी चांगली सुविधा मिळणार

औरंगाबाद शहरात १३ मार्च रोजी एका ५९ वर्षीय प्राध्यापक महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर या महिलेचा अहवाल नेगिटीव्ह आला. मात्र त्यानंतर पुण्याहुन परलेल्या २१ वर्षीय तरुण आणि दिल्ली-मनाली पर्यटनाहुन आलेल्या ५५ वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाल्याने शहरात अनेकांनी त्याची धास्ती घेतली आहे. ते राहत असलेले परिसर प्रशासनाने सिल केले.

यानंतर रविवार (ता.५) हा औरंगाबाद मधील रहिवांशाना धक्का देणार ठरला असून तब्बल पाच जणांचे अहवाल हे पॉझिटीव्ह आले आहे. यामध्ये एक ७ वर्षीय मुलीचा, ३८ वर्षीय, ४५ वर्षीय तर एका ४९ वर्षीय व्यक्तीचा अहवाल रविवारी पॉझिटीव्ह आला आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Positive Braking News