esakal | CORONAVIRUS :औरंगाबादेत चोवीस तासात दहा जणांचा मृत्यू, जिल्ह्यातील बळींची संख्या ७६७
sakal

बोलून बातमी शोधा

corona death new.jpg
  • - बुलडाणा व नगर जिल्ह्यातील दोन रुग्णांचा समावेश. 
  • - आतापर्यंत ७६७ जणांचा कोरोनाचे बळी. 

CORONAVIRUS :औरंगाबादेत चोवीस तासात दहा जणांचा मृत्यू, जिल्ह्यातील बळींची संख्या ७६७

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या चोवीस तासात घाटी रुग्णालयात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. यात बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा व नगर जिल्ह्यातील लोणार येथील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ७६७ जणांचा बळी गेला आहे. त्यापैकी घाटी रुग्णालयात आतापर्यंत ५८६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगीतले. 


घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना गेल्या चोवीस तासात दहा जणांचा बळी गेला आहे. यातील दोन रुग्ण नगर व बुलडाणा जिल्ह्यातील आहेत.

१) अविष्कार कॉलनी येथील ७० वर्षीय रुग्णास सहा सप्टेंबरला घाटीत उपचारासाठी दाखल करण्यात आले, मंगळवारी(ता.८) उपचारादरम्यान सकाळी ८.४५ वाजता मृत्यू झाला.

२) गंगापूर येथील ४६ वर्षीय रुग्णास चार सप्टेंबरला उचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. मंगळवारी(ता.८) सकाळी साडेसात त्यांचा मृत्यू झाला.

३) चारटा लासुर येथील ६५ वर्षे रुग्णास २ सप्टेंबरला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मंगळवारी(ता.८) रात्री ११:४५ वाजता या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

४) नाथनगरातील ६५ वर्षे रुग्णास २३ ऑगस्टला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मंगळवारी(ता.८)  दुपारी एक वाजता या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

५)  समतानगरातील ७२ वर्षीय महिलेस १३ ऑगस्टला उपचारासाठी दाखल करण्यात आले. बुधवारी(ता.९) त्या महिलेचा मृत्यू झाला.

६) मयूरपार्क येथील ४५ वर्षीय रुग्णास बुधवारी(ता.९)घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.

७) सिद्धेश्वरनगर, जाधववाडी येथील ६८ वर्षीय महिलेचा चार सप्टेंबरला उपचारासाठी घाटीत दाखल केले. बुधवारी(ता.९) दुपारी दोन वाजता त्या महिलेचा मृत्यू झाला.

८) हनुमाननगर, गारखेडा परिसर येथील ६५ वर्षीय रुग्णास ५ सप्टेंबरला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा बुधवारी(ता.९) पहाटे पाच वाजता मृत्यू झाला.

९) लोणार जिल्हा नगर येथील ६० वर्षीय रुग्णास २ सप्टेंबरला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मंगळवारी(ता.८) उपचारादरम्यान सकाळी नऊ वाजता  मृत्यू झाला.

१०) देऊळगाव राजा (जिल्हा बुलढाणा) येथील ७० वर्षीय महिलेस २ सप्टेंबरला उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. त्याच दिवशी त्या महिलेचा मृत्यू झाला.