esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Corona Updates

 रुग्णांची संख्या ९८ हजार ६९२ वर पोचली आहे. सध्या १५ हजार ३८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

Corona Updates: औरंगाबादेत बाराशे कोरोनाबाधित वाढले, आणखी दीड हजार रुग्ण बरे 

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी (ता.११) दिवसभरात १ हजार २८० कोरोनाबाधित आढळले. बरे झालेल्या आणखी १ हजार ४३५ रुग्णांना सुटी देण्यात आली. त्यात महापालिका क्षेत्रातील ९०० तर ग्रामीण भागातील ५३५ जणांचा समावेश आहे. रुग्णांची संख्या ९८ हजार ६९२ वर पोचली आहे. सध्या १५ हजार ३८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत ८१ हजार ३३० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. उपचारादरम्यान आणखी २९ जणांचा मत्यू झाला. मृतांची संख्या १ हजार ९८१ वर पोचली आहे. 

जिद्दीला सलाम! आजोबांनी ९२ व्या वर्षी कोरोनावर केली मात

वैजापूर येथील पुरुष (वय ६०), मोठीअली (ता. खुलताबाद) येथील महिला (६५), पैठण येथील महिला (७०), हनुमानगर, गारखेडा येथील पुरुष (६९), वाळूज येथील महिला (७५), सिटी चौक येथील पुरुष (६०), वडगाव (ता. औरंगाबाद) येथील पुरुष (३३), पुरनवाडी (ता. कन्नड) येथील (५५), रामनगर, औरंगाबाद येथील महिला (३५), पहाडसिंगपुरा येथील महिला (६९), बायजीपुरा येथील पुरुष (६१), सिल्लोड येथील पुरुष (४०), मिसारवाडी येथील महिला (२६), गावठाण हिंगोली (जि. औरंगाबाद) येथील पुरुष (७५), येथील आंबेडकरनगरातील पुरुष (३९), खोकडपुऱ्यातील महिला (६२), टीव्ही सेंटर, हडको येथील पुरुष (६८), बोधेगाव बुद्रक (ता. फुलंब्री) येथील महिला (७५), रांजणगाव शेणपुंजी (ता.गंगापूर) येथील महिला (३२), चिकलठाणा एमआयडीसी भागातील पुरुषाचा (६९) घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

अवघ्या पंगतीला तृप्त करणाऱ्यांवर अर्धपोटी राहण्याची वेळ, केटरिंग व्यवसायाचे मोडले कंबरडे 

बिल्डा, फुलंब्री येथील पुरुष (६३), शिवनगर, कन्नड येथील महिला (८०), फिरदोस गार्डन, पडेगाव औरंगाबाद येथील महिलेचा (४७) जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. विरमगाव (ता. फुलंब्री) येथील महिला (६६), मनजित नगर, औरंगाबाद येथील पुरुष (७०), ब्लू बेल अपार्टमेंट, प्रोझोन मॉल परिसरातील पुरुष (५४), आदित्य नगर, गारखेडा येथील महिला (७३), शिवशंकर कॉलनीतील महिलेचा (८५) खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. 

--- 
कोरोना मीटर 
-- 
आतापर्यंतचे बाधित ९८६९२ 
बरे झालेले ८१३३० 
उपचार घेणारे १५३८१ 
आतापर्यंत मृत्यू : १९८१ 

संपादन - गणेश पिटेकर

go to top