औरंगाबादकरांनो काळजी घ्या! कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, १३७ जण कोरोनाबाधित

प्रकाश बनकर
Thursday, 18 February 2021

रुग्णसंख्या ४७ हजार ९७९ झाली असून आतापर्यंत ४६ हजार २३५ रुग्ण बरे झाले आहेत.

औरंगाबाद :  जिल्ह्यात बुधवारी (ता.१७)  पुन्हा रुग्णसंख्या वाढली. दिवसभरात १३७ कोरोनाबाधित आढळले. मंगळवारी (ता.१६) जिल्ह्यात १२० रुग्ण आढळले होते. रुग्णसंख्या ४७ हजार ९७९ झाली असून आतापर्यंत ४६ हजार २३५ रुग्ण बरे झाले आहेत. ४९८ रुग्णांवर उपचार सुरू असून आजपर्यंत एक हजार २४६ जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

शहरातील बाधित
परिसर, कंसात रुग्णसंख्याः मोरेश्वर हा. सोसायटी (१), चेतक घोडा परिसर (१), आकाशवाणी परिसर, मित्रनगर (१), शिवाजीनगर (३), तिरुपती एक्झिक्यूट (१), एन नऊ सिडको (१), चौधरीनगर (१), एन नऊ हडको (१), एन सहा आविष्कार कॉलनी (३), एन वन सिडको (३), दशमेशनगर (१), संग्रामनगर (१), एन सात सिडको (२), नंदनवन कॉलनी (२), सातारा परिसर (३), सिंधी कॉलनी (३), मुकुंदवाडी (२), हायकोर्ट परिसर (१), एन चार सिडको (४), चिकलठाणा (१), बन्सीलालनगर (२), अजबनगर (१), राजे संभाजी कॉलनी (२), एन पाच सिडको (१), इटखेडा (१), सूतगिरणी परिसर (१), घाटी परिसर (२), बीड बायपास (४), सुदर्शननगर, हडको (१) द्वारकानगर (१), पटेलनगर (१), एन बारा हडको (१), क्रांती चौक (१), व्यंकटेशनगर (१), स्काय सिटी बीड बायपास (१), उस्मानपुरा (३), ज्योतीनगर (१), साई श्रद्धा नक्षत्रवाडी (१), सुराणानगर (१), मिलकॉर्नर, नवीन पोलिस कॉलनी परिसर (१), छत्रपतीनगर, बीड बायपास (२), अन्य (५३). एकूण ११९.

ग्रामीण भागातील बाधित
पैठण (१), सराफा बाजार सिल्लोड (१), वाळूज रेल्वेस्टेशन कॅम्प (१), साईनगर सोसायटी, हिरापूर (२), सलामपूर, वडगाव (१), बजाजनगर (२), नागद, कन्नड (१), वीरगाव, वैजापूर (१), सावंगी, लासूर स्टेशन (१), वैजापूर (१), फुलंब्री (१), अन्य (५) असे एकूण १८.

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Updates Covid 137 Cases Reported