esakal | औरंगाबाद जिल्ह्यातील धामणगाव, लाडसावंगीत गारपीट; फुलंब्री, बाजारसावंगीत रिमझिम पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

Hailstorm In Aurangabad District

सोंगणीअभावी पडुन असलेला मका झाकण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली होती.

औरंगाबाद जिल्ह्यातील धामणगाव, लाडसावंगीत गारपीट; फुलंब्री, बाजारसावंगीत रिमझिम पाऊस

sakal_logo
By
देवदत्त कोठारे/श्रीधर पाटील

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद शहरासह तालुक्यात बुधवारी (ता.17) दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी गार वारे सुरु झाले. तालुक्यातील बाजारसावंगीला रिमझिम पावसाने हजेरी लावल्यानंतर धामणगाव ते बोडखा या पट्ट्यात सायंकाळी सहाच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. धामणगाव येथे गारांचा पाऊस पडला. गारा या बोराच्या आकाराच्या एवढ्या होत्या. या अवकाळी झालेल्या पावसामुळे परिसरातील ओंब्यात असलेला तसेच सोंगणीला आलेल्या गव्हाला फटका बसला आहे.

वाचा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मावशीचे निधन, वीस मिनिटांची भेट ठरली शेवटची

सोंगणीअभावी पडुन असलेला मका झाकण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली होती. औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीटीचा पाऊस झाला. यामुळे सोंगणीस आलेले गहू हरभऱ्यासह सूर्यफूल पिकाचे नुकसान झाले आहे. तालुक्यात करमाड व परिसरातील बहुतांश गावांत जोरदार वाऱ्यासह वीजांचा कडकडाट होत होता. बाजारसावंगी परिसरात सायंकाळी सव्वा सहाच्या दरम्यान ढगांचा गडगडाट होऊन रिमझिम पाऊस दहा मिनिटे बरसला.

वाचा : रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईजवळ बसून चिमुकले बहीण-भाऊ दिवसभर रडले, बापाच्या कृत्याने शेजारी गेले चक्रावून


गव्हाचा बहारलेला हंगाम यासाठी हा पाऊस अपायकारक आहे. तसेच मका खरेदी व्यावसायिकांची मका गोळा करणे व झाकण्यासाठी तारांबळ उडाल्याचे दिसले. महावितरण कंपनीची वीज या भागात पाच वाजेपासून वादळ व ढगांचा अंदाज आल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.

वाचा : विहिरीला पाणी न लागल्याने तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन संपवले आयुष्य, कसाबसा रेटला संसाराचा गाडा

फुलंब्रीत रिमझिम पाऊस झाला असून गंगापूर तालुक्यातील कायगाव परिसरात ढगाळ वातावरण असल्याने वातावरणात गारवा आहे. गहू, कांदा, हरभरा उत्पादक शेतकरी मात्र चिंतेत आहेत. दुसरीकडे वैजापूर तालुक्यातील महालगावमध्ये ढगाळ वातावरण आहे.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

संपादन - गणेश पिटेकर