esakal | Corona : औरंगाबादेत 105, आणखी 10 रुग्ण सापडले
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

कोरोना बाधितांमध्ये संजयनगर, मुकुंदवाडी येथील 2, किलेअर्क येथील 1, पैठणगेट येथील 4, भीमनगर येथील 1, बडा तकिया मशीद सिल्लेखाना येथील 1 आणि दौलताबाद येथील 1 अशा नव्या दहा रुग्णांचा पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये समावेश आहे.

Corona : औरंगाबादेत 105, आणखी 10 रुग्ण सापडले

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : सोमवारी एकाच दिवशी 29 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर औरंगाबाद हादरले. त्यानंतर मंगळवारची पहाटही तेरा जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने औरंगाबादकरांसाठी धक्का देणारी ठरली. पुन्हा मंगळवारी (ता. 28) दुपारी आणखी 10 जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बाधितांचा आकडा १०५ वर गेला, अशी माहिती घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

कोरोना बाधितांमध्ये संजयनगर, मुकुंदवाडी येथील 2, किलेअर्क येथील 1, पैठणगेट येथील 4, भीमनगर येथील 1, बडा तकिया मशीद सिल्लेखाना येथील 1 आणि दौलताबाद येथील 1 अशा नव्या दहा रुग्णांचा पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये समावेश आहे.

आता औरंगाबादेत कोरोनाबाधितांची संख्या 105 झाली आहे. 15 मार्च ते 26 एप्रिल या दरम्यान रुग्णसंख्या पन्नासच्या वर गेली होती. मात्र दोनच दिवसांत आता रुग्णसंख्या 52 वर गेली आहे. त्यामुळे औरंगाबादकरांसाठी ही धोक्याची घंटा ठरत आहे.

औरंगाबाद शहरामध्ये दोन दिवसात 52 रुग्ण 
नूर कॉलनी                 - 12
काळा दरवाजा             -01
किलेअर्क                   - 26
आसेफिया कॉलनी        -02
भावसिंगपुरा                -03
दौलताबाद                  -01
पैठणगेट                    - 04
सिल्लेखाना                -01
संजयनगर मुकुंदवाडी   -02

---------------------------------
एकूण                        -52

शहरात १५ मार्चला पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. परदेशातून आलेल्या एका महिलेला संसर्ग झाला. त्यानंतर तब्बल १५ दिवस शहरात नवा रुग्ण आढळला नाही. त्यामुळे शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला; पण दोन एप्रिलला एन- चारमधील एका महिलेला बाधा झाली आणि त्यानंतर आजपर्यंत (ता. 28) तब्बल 105 व्यक्ती कोरोनाग्रस्त झाल्या.

उपचार घेत असलेले रुग्ण  - 76
------------------------------------------
बरे झालेले रुग्ण               - 23
------------------------------------------
मृत्यू झालेले रुग्ण             - 06
------------------------------------------
एकूण                            - 105
------------------------------------------