कोरोनाग्रस्त महिलेनं दिला गोंडस मुलीला जन्म : नैसर्गिक प्रसूती, बाळ-बाळंतीण सुखरूप

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 May 2020

बायजीपुरा येथील २८ वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेनं आज घाटी रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळ आणि बाळंतिणीची प्रकृती सुखरूप असल्याचं घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितलं.

औरंगाबाद : बायजीपुरा येथील २८ वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेनं आज घाटी रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळ आणि बाळंतिणीची प्रकृती सुखरूप असल्याचं घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितलं.

सध्या घाटीच्या स्पेशल कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधित क्षेत्रातून येणाऱ्या महिलांचे लाळेचे नमुने आठवडाभरापासून तपासण्यात येत आहेत. यात आतापर्यंत 30 जणींचे अहवाल निगेटिव्ह आले. काल बायजीपुरा येथील 28 वर्षीय महिला प्रसूतीसाठी घाटी रुग्णालयात भरती झाली होती. डॉ. प्रशांत भिंगारे व त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले.

कंडोमचा स्टॉक संपला, गर्भनिरोधक गोळ्या द्या

आज सकाळी त्या महिलेनं नैसर्गिक प्रसूतीद्वारे गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाचं वजन 2 किलो 8०० ग्राम भरलं असून, बाळ आणि बाळंतीण सुखरूप असल्याचं घाटीचे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा म्हणाले. या महिलेचा स्वॅबचा अहवालही आज सकाळी प्राप्त झाला. तो कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे तिला कोरोना क्रिटिकल हॉस्पिटलला हलवण्यात आले आहे. डॉ. लक्ष्मीकांत देशमुख आणि डॉ. अमोल जोशी या बाळाची काळजी घेत आहे.

घाटीत यापूर्वीही मुंबईतून आलेल्या एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेची सिझेरियनद्वारे प्रसूती झाली होती. ही राज्यातली दुसरी, तर जगातली पाचवी प्रसूती ठरली होती. ती महिलाही आता कोरोना मुक्त झाली असून, बाळाचाही अहवाल निगेटिव्ह आला होता. आज जन्मलेल्या बाळाचेही स्वॅबचे नमुने तपासण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Updates Positive Woman Gave Birth To A Baby Girl In GMCH