esakal | अवघ्या चार दिवसांत पावणेसहाशे रुग्ण! कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची झपाट्याने वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Corona Updates

शहर व जिल्ह्यात जानेवारीत कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकडा कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकडा वीसच्या आत आळा हाेता. पण गेल्या आठवड्यापासून रुग्णांची संख्या वाढतच आहे.

अवघ्या चार दिवसांत पावणेसहाशे रुग्ण! कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची झपाट्याने वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - कोरोनाचा आलेख झपाट्याने वाढत असून, गेल्या चार दिवसांत तब्बल पावणे सहाशे रुग्ण आढळून आले आहेत. यातील ४९१ रुग्ण शहरातील तर ८० ग्रामीण भागातील आहेत. रोज शंभरपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असल्यामुळे प्रशासनाने नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरु केली आहे.

वाचा - औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारची दुभाजक ओलांडून ट्रकला धडक; एक ठार, तर एक गंभीर जखमी

शहर व जिल्ह्यात जानेवारीत कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकडा कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकडा वीसच्या आत आळा हाेता. पण गेल्या आठवड्यापासून रुग्णांची संख्या वाढतच आहे. गेल्या आठवड्यात कोरोनाचे रोज २० ते ३० रुग्ण आढळून येत होते. मात्र चार दिवसांत यात मोठी वाढ झाली आहे. ता.१६ ते १९ फेब्रूवारी या चार दिवसांत जिल्ह्यात ५१७ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यात शहरात रुग्णसंख्या जास्त आहे. शहराच्या विविध भागांत रुग्ण आढळून येत आहेत. सातारा-देवळाई भागात तर एकाच घरात तीन ते चार रुग्ण आढळून येत असल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे उपाययोजना करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. 

जास्त रुग्ण असलेल्या भागात सर्वेक्षण : कोरोना संसर्ग कमी होत असल्याने आरोग्य यंत्रणा काही काळ शांत होती. पण आता नव्याने संसर्ग वाढताच महापालिकेने शहरात काटेकोरपणे उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्यानुसार नियम न पाळणाऱ्या मंगल कार्यालये, शिकवण्यांची तपासणी सुरु केली जात आहे. ज्या घरात दोन ते तीन रुग्ण आढळत आहेत, अशा भागात सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे.

Edited - Ganesh Pitekar