esakal | स्क्रु ड्रायव्हरने भोसकले; प्लॉटच्या वादातून भावाचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

crime

शहानगरात प्लॉटच्या वादातून रिक्षाचालकाचा खून झाला आहे. सख्ख्या लहान भावानेच रस्त्यात अडवून बेदम मारहाण करत त्याला स्क्रु ड्रायव्हरने भोसकले.

स्क्रु ड्रायव्हरने भोसकले; प्लॉटच्या वादातून भावाचा खून

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : शहानगरात प्लॉटच्या वादातून रिक्षाचालकाचा खून झाला आहे. सख्ख्या लहान भावानेच रस्त्यात अडवून बेदम मारहाण करत त्याला स्क्रु ड्रायव्हरने भोसकले. रविवारी (ता. १३) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. भाऊ आणि पुतण्यांनी मिळून हा खून केल्याचे सांगितले जाते. 

शामराव रामभाऊ साबळे (वय ५७, रा. अशोकनगर, मसनतपूर, चिकलठाणा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचे जावई जीवन जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे शामराव साबळे यांचे लहान भाऊ भाऊलाल रामभाऊ साबळे याच्यासोबत प्लॉटवरुन वाद सुरु होते. आज दुपारी शामराव हे मुलगा प्रदीपसोबत रीक्षा भाडे घेऊन शहानगरात गेले होते. प्रवाशी सोडून ते घराकडे येत असताना भाऊलाल आणि प्रमोद, विनोद आणि विशाल ही तीन मुले, मेहुणा शेषराव वाहुळ यांनी त्यांची रिक्षा अडविली. त्यानंतर त्यांना पाच जणांनी बेदम मारहाण केली. यानंतर स्क्रू ड्रायव्हरने भोसकले. यात शामराव हे जागीच बेशुद्ध पडले.

मित्राच्या वाढदिवसाला तलवार घेऊन नाचले, अन बाराच्या भावात गेले

जावई जीवन जाधव आणि मुलगा प्रदीप यांनी गंभीर जखमी शामराव साबळे यांना घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. उपनिरीक्षक अमरनाथ नागरे हे पथकासह घटनास्थळी धावले. एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, यापुर्वी देखील प्लाटच्या वादावरून शामराव साबळे यांना भाउलाल साबळे आणि तीन मुलांनी मारहाण केली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली होती.

(edited by- pramod sarawale)