
सोमवारी रात्री सिटी चौक पोलिसांनी अक्रम शेर खान यास अटक केली.
औरंगाबाद: शहरातील बुढीलाइन परिसरातील भंगाराच्या गोदामाजवळ गोळीबार करणाऱ्या दुसऱ्या संशयितास सोमवारी (ता. १) रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. अक्रम शेर खान असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. २८ जानेवारीला रात्री बुढीलाइन येथे भंगार गोदामाजवळ किरकोळ कारणावरून गोळीबार करण्यात आला होता.
यात अब्दुल जब्बार अब्दुल सत्तार जखमी झाला होता. त्याच्या फिर्यादीनुसार सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. २९ जानेवारीला शेख महंमद अहमद ऊर्फ राजाभाई यास अटक करण्यात आली होती. मात्र त्याचा साथीदार फरारी होता. आज सिटी चौक पोलिसांनी अक्रम शेर खान यास अटक केली.
शहरातील रस्ते भुयारी गटारीसाठी खोदल्याने चिमुकल्यांनी नगरपरिषेदेलाच बनवले...
त्याच्याकडून पिस्टलसह चार काडतुसे जप्त करण्यात आली. उपनिरीक्षक मंहाडुळे, पोलिस नाईक संजय नंद, शेख गफार, रोहिदास खैरनार, पोशी संदीप तायडे, देशराज मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.