esakal | ‘शिर्डीला मित्रांसोबत दर्शनासाठी जाऊ नको’,असे सांगताच वडिलांवर राग धरुन सतरा वर्षांचा मुलगा बेपत्ता
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Crime News Sandesh Pawar

चार दिवसांपासून फिर्याद दाखल असतानाही पोलिसांना अद्यापपर्यंत यश आलेले नाही.

‘शिर्डीला मित्रांसोबत दर्शनासाठी जाऊ नको’,असे सांगताच वडिलांवर राग धरुन सतरा वर्षांचा मुलगा बेपत्ता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गंगापूर (जि.औरंगाबाद) : कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे "शिर्डीला मित्रांसोबत दर्शनासाठी जाऊ नको" असे सांगताच वडिलांवर राग धरून कनकोरी (ता. गंगापूर) येथील संदेश बाबासाहेब पवार (वय 17) हा मुलगा गंगापूर शहरातून बेपत्ता झाला आहे. मुक्तानंद महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेत असलेला संदेश पवार हा कनकोरी येथील प्रगतशील शेतकरी बाबासाहेब पवार यांचा मुलगा आहे.

वाचा : औरंगाबादकरांनो काळजी घ्या! कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, १३७ जण कोरोनाबाधित

शनिवारी (ता. 13) गंगापूर शहरातून शिकवणीचा वर्ग आटोपून कुठेतरी निघून गेला. सायंकाळ झाली तरी मुलगा घरी परतला नाही म्हणून वडिलांनी मुलाच्या मोबाइलवर संपर्क साधला तरी मुलाने मोबाइल व मोटारसायकल शिकवणी वर्गाच्या बाहेर सोडूनच निघून गेल्याचे समजले. याविषयी येथील पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवली आहे. चार दिवसांपासून फिर्याद दाखल असतानाही पोलिसांना अद्यापपर्यंत यश आलेले नाही.


संपादन - गणेश पिटेकर