esakal | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरुध्द क्रांती पोलिस स्टेशनमध्ये तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

raj thakre.

नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी मास्क लावला नव्हता तसेच त्यांनी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यांनाही मास्क काढायला लावले होते

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरुध्द क्रांती पोलिस स्टेशनमध्ये तक्रार

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे मास्कचा वापर इतरांनाही करू देत नसल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करणारा एक तक्रार अर्ज रविवारी क्रांती चौक पोलिसांना देण्यात आला आहे. राज्यात कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या वाढत असताना अलिकडेच नाशिक दौऱ्‍यावर आलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्वत: देखील मास्क लावले नव्हते.

अ‍ॅड. रत्नाकर चौरे यांनी हा अर्ज दिला असून, त्यावर कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी अर्ज वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्याची माहिती क्रांती चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणपत दराडे यांनी दिली.

Maratha reservation: सर्वोच्च न्यायालयात आजपासून मराठा आरक्षणावर सुनावणी

नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी मास्क लावला नव्हता तसेच त्यांनी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यांनाही मास्क काढायला लावले. त्यांच्या या कृत्यातून समाजात वेगळा संदेश जात आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे असेही तक्रारी अर्जात म्हटले आहे.