
सायबर भामट्याचा ऑनलाईन गंडा; हजारो रुपयांना गंडा... घराचे भाडे देणे पडले महागात
औरंगाबाद: घर किरायाने घेण्यासाठी डिपॉझिट देण्याच्या नावाखाली ऑनलाईन पैसे पाठविण्याच्या प्रक्रियेत सायबर भामट्याने एका डॉक्टराला तब्बल ८२ हजाराचा गंडा घातला. डॉ. रोहित पूरूषोत्तम शाह (६५, रा. गारखेडा परिसर) यांचा नक्षत्रवाडी भागातील टु बीएचके फ्लॅट किरायाने द्यावयाचा होता.
या फ्लॅटसाठी डॉ. रोहित शाह यांचा मुलगा मयुर यांने एका वेबसाईटवर माहिती दिली. त्यानंतर ६ फेब्रुवारी २०२१ रोजी रामविलास सिंग नावाच्या एका व्यक्तीचा फोन आला. त्याने सीआरपीएफ येथे कामाला असल्याचे सांगितले. संबंधिताने आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे पाठवून डॉ. शाह यांचा विश्वास संपादन केला.
Corona Update : औरंगाबादेत ६६ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४५ हजार ९५५ कोरोनामुक्त
दहा हजार रूपये महिना भाडे भरण्यासाठी तयारी दर्शवली. डॉ. शाह यांनी सदर रामविलास सिंग याला ३० हजार रूपये डिपॉझिट भरावे लागतील असे स्पष्ट केले. रामविलास सिंग नावाच्या व्यक्तीने तुमच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करतो असे सांगत पैसे ट्रान्सफर करण्यासाठी शाह यांच्या मोबाईलवर क्युआर कोड पाठविला.
शेतकरी बापाचा विश्वास लेकीने जिंकला, उपसरपंचपदी झाली बिनविरोध निवड
हा क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर सहाय यांच्या अकाऊंटवरून काही वेळेतच एकूण ८२ हजार रूपये काढून घेतले. या प्रकरणात डॉ. शाह याच्या तक्रारीवरून रामविलास सिंग याच्या विरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(edited by- pramod sarawale)