
बीड जिल्ह्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उध्दव भोसले, आसाब शेख आणि विशाल पारधे यांच्याविरुध्द न्यायालयाने मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे
औरंगाबाद: जामीनावर मुक्त होण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाचे तीन बनावट जामीनपत्र तयार करुन कारागृहाच्या पेटीत टाकून शासनाची फसवणूक केलेल्या तीन कैद्यांविरुध्द हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उध्दव उर्फ उद्या मजल्या भोसले, आसाब दस्तगीर शेख आणि विशाल मिलिंद पारधे अशी तिघांची नावे आहेत.
बीड जिल्ह्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उध्दव भोसले, आसाब शेख आणि विशाल पारधे यांच्याविरुध्द न्यायालयाने मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. ते गेल्या काही दिवसांपासून हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत आहेत. या तिघांना घाटी रुग्णालयातील कैद्यांसाठी असलेल्या विशेष वार्डमध्ये नेण्यात आले होते. दरम्यानच्या वेळात रुग्णांच्या नातेवाईकांना तिथे भेटता येते.
'तुमची अजाण तर आमचे शिवगान', भाजपचा शिवसेनेवर निशाणा
एकास टाकताना पकडले अन तिघांचे बिंग फुटले-
घाटी रुग्णालयातून कैद्यांना हर्सूल कारागृहात आणण्यात आल्यानंतर कैद्यांनी संगनमत करुन सोबत आणलेले न्यायालयाचे बनावट जामीनपत्र कारागृहातील टपाल पेटीत टाकले. दोघांनी जामिनपत्र टपाल पेटीत टाकल्यानंतर तिसऱ्याला टपालपत्र टाकताना तुरुंग अधिकारी इर्शाद याकुब सय्यद (३५, रा. मुजफ्फरनगर) यांनी पाहिले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सय्यद यांच्या तक्रारीवरुन सोमवारी (ता.१) सायंकाळी तिघांविरुध्द हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अतुल ठोकळ करत आहेत.
(edited by- pramod sarawale)