
घटनास्थळी झटापटीत संशयित आरोपीचा एक मोबाईल व आधार कार्ड आढळले आहे
पिशोर (जि.औरंगाबाद): पिशोर (ता.कन्नड) येथून जवळच असलेल्या कवड्या नदीवरील पुलालगत सिल्लोड-पिशोर रस्त्यावर रविवारी (ता.सात) सायंकाळी नऊ वाजता लुटमारीच्या उद्देशाने झालेल्या मारहाणीत एका महिलेचा खून झाल्याची घटना घडली. सिंधुबाई प्रभाकर जाधव (वय 58) असे मयत महिलेचे नाव आहे.
मयत महिलेच्या मुलाच्या धाडसामुळे एका आरोपीस पकडण्यात यश आले. मुलाच्या आरडाओरड ऐकून जमा झालेल्या आसपासच्या नागरिकांनी आरोपीस बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
Success Story: माळरानावर फुलवली जैविक भाजीपाला शेती; शेती पाहण्यासाठी परिसरातील...
घटनास्थळी झटापटीत संशयित आरोपीचा एक मोबाईल व आधार कार्ड आढळले आहे. घराच्या बाजूला असलेल्या नाल्यात पंधरा फूट खाली महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह पडलेला आढळला. मृत महिलेच्या मुलास सुद्धा बेदम मारहाण झालेली आहे. आरोपींची संख्या नेमकी किती होती हे अद्याप स्पष्ट नाही. मारहाण झालेल्या आरोपीस अधिक उपचारासाठी औरंगाबादला हलविले आहे. आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचे कळते.
(edited by- pramod sarawale)