त्या दोघींना पाहून तिघांनी काय केलं..?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 डिसेंबर 2019

घरात घुसल्यानंतर फारसा प्रतिकार होणार नाही याची त्यांना कल्पना होती. त्यांनी 28 डिसेंबरला सायंकाळी आजीबाईच्या घरी घुसखोरी केली. आजीबाईच्या साठ वर्षीय मुलीला ते घरात येत असल्याचे दिसले.

औरंगाबाद : त्र्यांऐंशी वर्षीय महिला व तिची साठ वर्षीय मुलगी घरात पाहुन तीन तरुणांनी त्यांना लक्ष्य केले. घरात घुसून दोघींना मारहाण करुन अक्षरश: काही विचारण्याच्या आत तिघांनी सोन्याची साखळी व पाटल्या ओरबडून नेल्या. ही गंभीर व तितकीच काळजी वाढविणारी घटना 28 डिसेंबरला जवाहरनगर सायंकाळी भागात घडली. 

जवाहरनगर भागात एक त्र्याऐंशी वर्षीय आजीबाई राहतात. त्यांच्याकडेच त्यांची साठ वर्षीय मुलगी राहते. आजीबाईंना तर उठताही येत नाही एवढ्या त्या क्षीण आहेत. दोघीही वयोवद्ध असल्याने ही संधी अठरा ते वीशीतील तीन तरुणांनी हेरली. एक दिवस प्लॅन करुन त्यांनी जवाहरनगर भागातील आजीबाईच्या घरी डल्ला मारण्याचा बेत आखला.

बाप रे - माहूर गडावर भाविकांच्या बसने घेतला पेट

घरात घुसल्यानंतर फारसा प्रतिकार होणार नाही याची त्यांना कल्पना होती. त्यांनी 28 डिसेंबरला सायंकाळी आजीबाईच्या घरी घुसखोरी केली. आजीबाईच्या साठ वर्षीय मुलीला ते घरात येत असल्याचे दिसले. तिघे पत्ता विचारायला येत असावे असा त्यांचा अंदाज होता. पण झाले उलटेच तिघांनी काही कळण्याच्या आत दोघींना मारहाण करायला सुरुवात केली.

अस्संय का - म्हणून हॉटेलवाले फेकतात पहिला चहा

आजीबाईंना तर विरोधही करता येत नव्हता पण त्यांच्या मुलीने विरोध केला तर त्यांना तिघांनी भिंतीकडे ढकलुन दिले. दोघी असहाय झाल्या. यादरम्यान एकाने अंगावरील बावीस ग्रॅमची 44 हजारांची सोन्याची पाटली हिसकावली. त्यानंतर दुसऱ्याने चौदा ग्रॅमची 28 हजारांची गळ्यातील दक्षीण भारतीय नक्षीची साखळी हिसकावली. त्यानंतर तिघांनी तेथून पलायन केले. 

सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट 

जवाहरनगर पोलिसांना घटनेची माहिती समजताच त्यांनी घटनानास्थळी धाव घेतली. त्यानंतर या भागातील दहा सीसीटीव्ही तपासल्या. त्यातील दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तरुण कैद झाल्याचे दिसुन आले. हे फुटेजही पोलिसांनी गोळा केले, परंतु ते अस्पष्ट असल्याचे समोर आले आहे. 

कातरवेळचा प्रकार 

एकीकडे ज्येष्ठांच्या सुरक्षेची हमी पोलिस प्रशासन घेत आहे. परंतु भरसायंकाळी एका घरात घुसुन टवाळखोर ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करतात. त्यानंतर सोन्याचे दागिने लुटुन नेतात ही गंभीर बाब आहे. या घटनेनंतर परिसरात घबराहट पसरली आहे.

हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Crime News Old Woman Looted by thieves