सासुरवाडीला गेलेला जावई माघारी घरी आलाच नाही; पोलिसांत तक्रार

यादव कुमार शिंदे
Wednesday, 10 February 2021

दोन दिवसांपासून तो घरीच परतला नसल्याने बहुलखेडा येथील कृष्णाच्या कुटुंबीयांनी नातेवाईक यांचेकडे शोध घेतला

सोयगाव (औरंगाबाद): सासरवाडीला गेलेला बहुलखेड्याचा जावई परत घरी आलाच नाही. यामुळे घरच्यांनी शोध घेऊनही मुलगा सापडला नसल्याने अखेरीस बुधवारी बनोटी पोलिस चौकीत तरुण हरविल्याची तक्रार दिली आहे.

बहुलखेडा (ता. सोयगाव) येथील तरुण कृष्णा हिंमत पवार (वय 25) हा दोन दिवसांपूर्वी पत्नीला भेटण्यासाठी मोहलाई (ता. सोयगाव) येथे मोटारसायकलवर गेला होता. सासुरवाडीनेही तो घरी निघतो म्हणून गेला होता. परंतु दोन दिवसांपासून तो घरीच परतला नसल्याने बहुलखेडा येथील कृष्णाच्या कुटुंबीयांनी नातेवाईक यांचेकडे शोध घेतला. परंतु अजून तरुणाचा तपास न लागल्याने अखेरीस बनोटी पोलीस चौकीत हिम्मत पवार यांनी मुलगा गायब झाल्याची तक्रार दिली आहे.

काय म्हणावं अशा दैवाला ! विराजच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदान, दवाखान्यात...

यावरून सोयगाव पोलीस ठाण्याचे तरुणांची हरवल्याची नोंद करण्यात आली असून या घटनेमूळे बहुलखेड्यात खळबळ उडाली आहे पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास दिलीप तडवी, विकास दुबिले, पवार आदी करत आहे

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad crime news son in law went Sasurwadi never came back home Report to police