Aurangabad Graduate Election Result Update : मतमोजणी केंद्रात फिजिकल डिस्टन्सचा फज्जा, ‘वंचित’चे विभागीय आयुक्तांकडे तक्रार

प्रकाश बनकर
Thursday, 3 December 2020

पदवीधर निवडणुकीचा मतमोजणी केंद्रात फिजिकल डिस्टन्स पाळले जात नाही. यासह अनेकांकडे मोबाईल दिसून येत असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे केली आहे.

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची चिकलठाणा एमआयडीसीतील कलाग्राम समोरच्या मराठवाडा रिएल्टर्स प्रा. लि. येथे गुरुवारी (ता.तीन) सकाळी आठला मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पदवीधर निवडणुकीचा मतमोजणी केंद्रात फिजिकल डिस्टन्स पाळले जात नाही. यासह अनेकांकडे मोबाईल दिसून येत असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे केली आहे. यात उमेदवारांसोबत आलेल्या सदस्यांनी ही तक्रार केली आहे. वंचितने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रात उमेदवार व त्यांच्यासोबत आलेल्या सदस्यांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेमध्ये फिजिकल डिस्टन्स ठेवण्यात आलेले नाही.

सध्या कोरोनामुळे उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यात उमेदवारांसोबत आलेल्या काही लोकांकडे मोबाईल आढळून आल्याची तक्रारही वंचितच पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. याची दखल घेत कारवाई करू असे आश्वासन केंद्रेकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना दिली. वंचित बहुजन आघाडीचे प्रभाकर बकुले, प्रवीण हिवाळे, भगवान खिल्लारे, खालेद पटेल, एस पी मगरे, पी.के दाभाडी, संतोष लोखंडे, विकास पठारे, रविराज राठोड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Graduate Election Result Update