
मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी पहिल्या दोन तासामध्ये एकूण ७.६३ टक्के मतदान झाले आहे.
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी पहिल्या दोन तासामध्ये एकूण ७.६३ टक्के मतदान झाले आहे. आतापर्यंत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील २८ हजार ४८७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्का बजावला आहे. आज मंगळवारी (ता.एक) सकाळी आठ वाजता मतदानाला सुरवात झाली आहे. सायंकाळी पाचवाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहणार आहे. औरंगाबाद येथील मतदान केंद्रात मतदारांची गर्दी पाहायला मिळत आहे.
आतापर्यंत जिल्हानिहाय मतदान केलेल्या मतदारांची एकूण संख्या
औरंगाबाद - ९८६५
जालना - २२६१
परभणी - २७५९
हिंगोली - ९९७
नांदेड - २८४९
लातूर - ३१३८
उस्मानाबाद - २१८१
बीड - ४४३७
संपादन - गणेश पिटेकर