esakal | औरंगाबादमध्ये अकडलेल्या तरुण-तरुणींना मदत 
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad - How to help young people trapped by coronavirus
  •  - जेवणाची व्यवस्था करून पाठवले गावी, 
  • - मातोश्री प्रतिष्ठाणचा पुढाकार 
  • - स्वखर्चाने वाहनांची व्यवस्था करून दिली

औरंगाबादमध्ये अकडलेल्या तरुण-तरुणींना मदत 

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला; मात्र येथे शिक्षण, नोकरी आणि कामानिमित्त राहत असलेल्या बॅचलर तरुण-तरुणीची यामुळे मोठी गैरसोय झाली. खाणावळ बंद झाल्याने त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली. अशा पूर्व विदर्भातील गरजू तरुण-तरुणींना गुरुवारी (ता. २६) मातोश्री प्रतिष्ठाणच्या सदस्यांना मदत करीत जेवण दिले आणि वाहनांची व्यवस्था करून त्यांना त्यांच्या गावी रवाना केले. 

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे. या काळात शहरातील नागरिकांना अहोरात्र सेवा देणारे पोलीलिस कर्मचारी तसेच बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे. ही उपासमार टाळण्यासाठी जयभवानीनगर येथील मातोश्री प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष हिंमत पटेल, गायत्री पटेल, महापालिका चिकलठाणा शाळेचे मुख्याध्यापक देवेंद्र सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी पोळीभाजी वाटप केंद्र सुरू करण्यात आले आहे. 

वाचा...  विनाअनुदान शाळांना मिळणार अनुदान    

दरम्यान, नागपूर, गोंदिया, यवतमाळ, भंडारा यासारख्या शहारातील अनेक तरुण, तरुणी अस्थायी स्वरुपात औरंगाबादच्या विविध भागात नोकरी करीत आहेत; परंतु संचारबंदीमुळे सर्व कंपन्या, व्यवसाय बंद झाले आहेत. त्यामुळे या तरुणवर्गावर आर्थिक अडचण निर्माण होऊन उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे हे विद्यार्थी आपापल्या गावी जाऊ शकत नाहीत. गुरुवारी हे तरुण, तरुणी स्वगावी आम्हाला पाठवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यासाठी पुंडलिकनगर येथील पोलिस स्टेशनमध्ये आले होते. ही सर्व तरुणमंडळी मोठ्या प्रमाणात घाबरलेली होती. 

हे ही वाचा -  शाळांच्या अनुदानाची वाट मोकळी  

मागील दोन दिवसांपासून यातील काही विद्यार्थी उपाशी असल्याचे पोलिस निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांना कळाली. त्यानंतर त्यांनी ही माहिती तातडीने मातोश्री प्रतिष्ठाणचे हिंमत पटेल यांना दिली. या प्रतिष्ठाणच्या सदस्यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली; तसेच सर्व विद्यार्थ्यांना आपापल्या गावी जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करुन त्यांच्या स्वगावी पाठवण्यात आले. यासाठी परमेश्वर हेडगे, मनीष वंजारे, सचिन पटेल, हनुमान कौचट, कर्नल अमोल वंजारे, बबलूभाई, योगेश जाधव, लक्ष्मण थेटे, श्याम क्षीरसागर, नितीन ढेंबरे, संदीप शिंदे यांनी पुढाकार घेतला. 
--