esakal | औरंगाबाद शहरावर जलसंकट; पाइपलाइनला आणखी दोन ठिकणी गळती
sakal

बोलून बातमी शोधा

pipeline leak.

सिडकोला पाणीपुरवठा करणाऱ्या एक्सप्रेस पाइपइलानच्या वॉल्व्हला सोमवारी (ता. आठ) बीड बायपासवर निशांत पार्कजवळ गळती लागली

औरंगाबाद शहरावर जलसंकट; पाइपलाइनला आणखी दोन ठिकणी गळती

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाइपलाइन जीर्ण झाल्याने त्या फुटण्याचे प्रकार सुरूच असून, रेल्वेस्टेशन रोडवर हॉटेल विट्स समोर १४०० मिलिमीटर व्यासाची फुटलेली पाइपलाइन दुरुस्त होत नाही तोच आणखी दोन ठिकाणी गळत्या लागल्या आहेत. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा संकटात सापडला आहे. सिडकोला पाणीपुरवठा करणाऱ्या एक्सप्रेस पाइपइलानच्या वॉल्व्हला सोमवारी (ता. आठ) बीड बायपासवर निशांत पार्कजवळ गळती लागली. तसेच क्रांती चौकातही पाइपलाइन फुटल्याने पाण्याची नासाडी सुरू आहे. ट्रॅफिकमुळे येथील दुरुस्तीचे काम पोलिसांनी थांबविले. आता रात्रीच्यावेळी दुरूस्ती केली जाणार आहे.

महापालिकेच्या दोन्ही पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाल्या आहेत. पाइपलाइनची झीज झाल्याने त्या वारंवार फुटून शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. रेल्वेस्टेशन रोडवर हॉटेल विटस् येथे रविवारी पहाटे १४०० मिलिमिटर व्यासाची पाइपलाइन फुटल्याने जुन्या शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. तसेच पाइपलाइनचे पाणी दुकानात शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. यठिकाणी दुरुस्ती करून महापालिकेचे अधिकारी उसंत घेत नाहीत तोच जालना रोडलगतच असलेल्या कांती चौक जलकुंभाजवळ कोटला कॉलनीकडे जाणारी २५० मिलिमिटर व्यासाच्या पाइपलाइनला गळती लागली. रस्त्यावर पाणी वाहत असल्याने महापालिकेने तातडीने काम हाती घेतले होते. पण त्यात अडथळा आहे.

तुम्हाला माहीत आहे का? एकेकाळी आफ्रिकन गुलाम असलेल्या माणसाने वसवले औरंगाबाद

प्रचंड वाहतुकीमुळे पोलिसांनी रोखले काम- 
पाइपलाइनची गळती बंद करण्यासाठी दुपारी महापालिकेने जेसीबीच्या माध्यमातून उड्डाणपुलालगत खोदकाम सुरू केले होते. मात्र या कामामुळे वाहतुकीची कोंडी झाली. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप केला. आता सोमवारी रात्री दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी सांगितले.

Corona Update: मराठवाड्यात कोरोनाचे नवे १३५ कोरोना रुग्ण, चार जणांचा मृत्यू 

दिवसभर वाहिले पाणी- 
बीड बायपास रस्त्यावर निशांत पार्कजवळ सिडकोला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइच्या वॉल्व्ह मधून दिवसभर पाणीगळती सुरू होती. त्यामुळे महिलांची याठिकाणी पाणी भरण्यासाठी गर्दी केली. दरम्यान कार्यकारी अभियंता धांडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व वॉल्‍व्हच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. रात्रीतून हे काम पूर्ण केले जाणार असल्याचे धांडे यांनी सांगितले.

(Edited by- pramod sarawale)