अवघ्या एका महिन्यात उभारलेले कोविड रुग्णालय होणार सुरू

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 June 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले. दरम्यान रुग्णालयाच्या एका विभागात पावसाचे पाणी आल्याचे समोर आले होते. ही गळती बंद करण्यात आली असून, सोमवारपासून रुग्णालय सुरू केले जाणार असल्याचे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. 

औरंगाबाद : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्य शासनाने अवघ्या एका महिन्यात चिकलठाणा एमआयडीसी भागात सुमारे साडेसहा कोटी रुपये खर्च करून कोविड-१९ रुग्णालय उभारले आहे. १२ जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले. दरम्यान रुग्णालयाच्या एका विभागात पावसाचे पाणी आल्याचे समोर आले होते. ही गळती बंद करण्यात आली असून, सोमवारपासून रुग्णालय सुरू केले जाणार असल्याचे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. 

शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या रुग्णांचा भार घाटी रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयावरच आहे. रुग्ण संख्या अशीच वाढली तर उपाय-योजना म्हणून चिकलाठाणा एमआयडीसी भागात मेल्ट्रॉन कंपनीच्या जागेत २५६ खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय पालकमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला.

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  

एका महिन्यात एमआयडीसीमार्फत सुमारे साडेसहा कोटी रुपये खर्च करून हे रुग्णालय उभारण्यात आले. १२ जूनला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने रुग्णालयाचे उद्‍घाटनही झाले. मात्र अद्याप रुग्णालय सुरू झालेले नाही. दरम्यान रुग्णालयाच्या एका विभागात पावसाचे पाणी आल्याचा प्रकार समोर आला होता. हे पाणी बंद करण्यात आले असून, उर्वरित कामांवर शेवटचा हात मारला जात आहे. महापालिकेच्या सूचनेनुसार फलक लावण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

खिडक्यांना फक्त जाळ्या 
रुग्णालयाच्या इमारतीच्या खिडक्यांना गज नाहीत. त्यामुळे मच्छरांच्या अटकावासाठी वापरण्यात येणाऱ्या जाळीने खिडक्या बंद करण्यात आल्या आहेत. हा प्रकार रुग्णांसाठी असुरक्षित असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेत खल सुरू आहे. दरम्यान एका महिन्यात तेही लॉकडाऊनच्या काळात एवढे सुसज्ज रुग्णालय उभारण्याची किमया एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी करून दाखविली आहे. 

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; ९७ टक्के एफआरपी रक्कम कारखान्यांनी केली अदा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Kovid Hospital starts from Monday