esakal | ‘जायकवाडी’त ८२ प्रकारचे पक्षी; कोरोनामुळे झाला गणनेस उशीर

बोलून बातमी शोधा

jaikvadi}

बॅकवॉटर परिसरातील विविध ३० ठिकाणी झाली गणना, जायकवाडी पक्षी अभयारण्यात १९८६ पासून २४९ पक्ष्यांच्या प्रजाती आढळून येतात

‘जायकवाडी’त ८२ प्रकारचे पक्षी; कोरोनामुळे झाला गणनेस उशीर
sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद: वन्यजीव विभागातर्फे रविवारी (ता.२८) जायकवाडी अभयारण्यात पक्षी गणना झाली असून पक्ष्यांच्या ८२ प्रजाती आढळल्या. जायकवाडीच्या बॉकवॉटर परिसरातील ३० ठिकाणी ही गणना झाली असून दक्षिण जायकवाडी परिसरातील ७४ प्रकारचे पक्षी आढळले आहेत. पक्षांच्या प्रजातींची एकूण संख्या सोमवारी (ता.१) जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सहायक वनसंरक्षक डॉ. राजेंद्र नाळे यांनी सांगितले.

सकाळी सातपासून पक्षी गणना सुरू झाली. सकाळच्या सत्रात वन्यजीव विभागाचे विभागीय वनअधिकारी विजय सातपुते, सहायक वनसंरक्षक डॉ. राजेंद्र नाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी गीते, पक्षीप्रेमी किरण परदेशी, राहुल कासार, डॉ. किशोर पाठक, रंजन देसाई, मानस देसाई, श्रीकांत धांडे, मयूरा धांडे यांच्या उपस्थितीत वेगवेगळ्या ठिकाणी गणना झाली. या गणनेत 'लालसरी बदक, वारकरी बदक, भुवई बदक, थापट्या, शेकट्या, कुरल तुतारी, शेंडी बदक, तरंग विविध बगळे, विविध शराटी, शेंडी बदक, पानमोर , गोडविट बदक इतर अशा एकूण ८२ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद झाली. 

फिरत्या सूक्ष्मदर्शकेतून सागरी सूक्ष्मजीवांचे दर्शन, पंचावन्न वर्षीय मारुती...

कोरोनामुळे गणनेस विलंब 
जायकवाडी पक्षी अभयारण्यात १९८६ पासून २४९ पक्ष्यांच्या प्रजाती आढळून येतात. दरवर्षी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान पक्षी गणना होते. यंदा कोरोनामुळे या कामाला उशीर झाला. 

सभापतीपदी पुन्हा राधाकिसन पठाडे, न्यायालयाच्या आदेशानंतर जल्लोषात स्वीकारला...

यावेळी संख्या कमी-
जायकवाडी जलाशय परिसर ३३९ स्क्वेअर किलोमीटरचा आहे. जलाशयाच्या ६० स्वेअर किलोमीटर प्रमाणात ही गणना झाली. यावेळी पक्ष्यांची संख्या कमी दिसली. उत्तर व मध्य भारतात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. यामुळे ठिकठिकाणी पाणथळ जागांत वाढ झाली. त्यामुळे उत्तरेकडून येथे येणाऱ्या पक्ष्यांची संख्या कमी झाली. आपल्याकडे उत्तरेकडील पक्षी दक्षिणेकडे जातात. आताचे पक्षी आहेत ते दक्षिणेकडील पक्षी उत्तरकडे जाणारे आहेत. यंदा पक्षी गणनेसाठी ठिकाणे वाढवली आहेत. गणनेसाठी अनेक पक्षीप्रेमींनी मदत केली, असे सहायक वनसंरक्षक डॉ. राजेंद्र नाळे यांनी सांगितले.