MPSC Exam Updates : प्रवेश प्रमाणपत्र हेच प्रवासाचा पास म्‍हणून ग्राह्य धरले जाणार

MPSC Exam Updates
MPSC Exam Updates

औरंगाबाद : महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगातर्फे आयोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा- २०२० ही रविवारी (ता.२१) होणार आहे. त्यासाठी औरंगाबाद जिल्‍ह्यात ५९ शाळा, महाविद्यालयांत व्यवस्था करण्यात आली आहे. १९ हजार ६५६ उमेदवार औरंगाबादेत परीक्षा देणार आहेत. रविवारी सकाळच्या सत्रात १० ते १२ आणि दुपारच्या सत्रात तीन ते पाच दरम्यान परीक्षा होणार आहे. यासाठी २१६७ अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे. परीक्षेकरिता नियुक्‍त करण्‍यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना कोविड-१९ विषाणूच्‍या अनुषंगाने एक्स्ट्रा प्रोटेक्टिव कीट, परीक्षेकरिता उपस्थित राहणाऱ्या प्रत्‍येक उमेदवाराकरीता बेसिक कोविड कीट आणि कोरोना विषाणूची लक्षणे दिसून येत असलेल्‍या उमेदवारांच्‍या वापराकरिता पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट कीट आयोगामार्फत पुरविण्‍यात येणार आहे.


अंशतः लॉकडाऊनच्‍या अनुषंगाने उमेदवार व त्‍यांचे पालक यांना आयोगाकडून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज प्रणालीव्‍दारे वितरित करण्‍यात आलेले प्रवेश प्रमाणपत्र हे त्‍यांच्‍यासाठी प्रवासाचा पास म्‍हणून ग्राह्य धरण्‍यात येणार आहे. परीक्षेसाठी स्‍वतंत्र ई-पास अथवा इतर कोणत्‍याही परवानगीची आवश्‍यकता असणार नाही. तथापि, प्रवेश प्रमाणपत्रासोबत उमेदवाराने ओळखीच्‍या पुराव्‍याकरिता आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र अथवा स्‍मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्‍स यापैकी कोणतेही एक जवळ बाळगणे व तसे तपासणीच्‍या वेळी सादर करणे अनिवार्य राहिल.

उमेदवारांनी जेवण सोबत आणा
जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणचे अध्यक्ष यांनी घेतलेल्या निर्णयानुसार औरंगाबादमध्ये २० आणि २१ मार्चला हॉटेल्‍स, रेस्‍टॉरंट पूर्णतः बंद असतील. त्‍यामुळे उमेदवारांनी भोजनाचे पदार्थ सोबत आणावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी रीता मेत्रेवार यांनी केले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com