esakal | Break the Chain: कन्नड शहरात व्यवहार बंद, ग्रामीण भागात मात्र दुकाने सुरु 

बोलून बातमी शोधा

kannad lockdown

संपूर्ण बाजारपेठ बंद असेल तरच व्यापारी बंद पाळतील, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली होती

Break the Chain: कन्नड शहरात व्यवहार बंद, ग्रामीण भागात मात्र दुकाने सुरु 
sakal_logo
By
संजय जाधव

कन्नड (औरंगाबाद): 'ब्रेक द चेन'ला विरोध दर्शवत कन्नड शहरातील व्यापारी सोमवारी (ता.१२) आपली दुकाने उघडण्याच्या भूमिकेत होते. सकाळी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडण्याचा प्रयत्नही केला. मात्र, पोलिसांनी शहरभर फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यानुसार व्यापाऱ्यांनी दुकाने पुन्हा बंद केली. शहरातील दुकाने बंद असली तरी ग्रामीण भागात बहुतांशी दुकाने सुरु असल्याचे चित्र होते.

संपूर्ण बाजारपेठ बंद असेल तरच व्यापारी बंद पाळतील, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली होती. त्यानुसार शासनाने सोमवारी सकाळ पर्यंत कोणताही निर्णय न घेतल्याने शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला होता.

Corona virus| वैद्यकीय शाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

सोमवारी सकाळी काही व्यापाऱ्यांनी आपले दुकान उघडले. मात्र, पोलिस व नगर पालिका प्रशासनाने शहरभर फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन करताच पुन्हा दुकाने बंद झाली. सर्वच व्यापारी दुकान बंद करून दुकानाबाहेर चर्चा करत होते. इतर दुकानदाराने दुकान उघडले का बघत होते. यामुळे दिवसभर दुकानदार व नागरिकांत संभ्रम होता. 

थरार! सहा वर्षीय शौर्यला सोडवण्यासाठी पोलिसांना विकावी लागली पाणीपुरी...

शहरातील दुकाने उघडण्याच्या व्यापाऱ्यांच्या भूमिकेला प्रशासनाने जुमानले नाही. संपूर्ण लॉकडाउन लागल्यास त्याची पूर्वतयारी करण्यासाठी प्रशासनाने व्यापाऱ्यांना किमान दोन दिवस दुकाने उघडू दिले पाहिजे होते. लॉकडाउन लागल्यास दुकानदारांची मार्च एंन्डची व इतर कामे तसेच राहून जातील.