esakal | Gram Panchayat Election: औरंगाबाद तालुक्यातील 114 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

aurangabad gram panchayat.

शुक्रवारी औरंगाबादचे तालुक्यातील 114 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत झाली

Gram Panchayat Election: औरंगाबाद तालुक्यातील 114 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

sakal_logo
By
सुनिल इंगळे

औरंगाबाद: तालुक्यातील 114 ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण सोडत शुक्रवारी मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्रात करण्यात आले. यात सर्वसाधारण 60 ओबीसी 31 अनुसूचित जाती 20 व N T प्रवर्गातील 3 जागा सुटल्या आहेत.

शुक्रवारी औरंगाबादचे तालुक्यातील 114 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण प्रतिक्षा पचनोरे या मुलीच्या हस्ते सोडत झाली. यात जटवाडा, शरणापुर, आडगाव सरक, शेंद्राबंन, गोलटगाव, गिरणारा, खोडेगाव, गारखेडा, वंजारवाडी, सारंखेडा, लिंगदरी, माळीवाडा, वळदगाव, देमणी, पाचोड, निपाणी, वडगाव कोल्हाटी, पंढरपूर, पिंपळखुंटा, गोलवाडी, नायगव्हाण, भिंदोन, टोणगाव, कुंबेफळ, वाहेर, मंगरूळ, पांढरी पिंपळगाव, भालगाव, चिंचोली, झाल्टा, तिसगाव अशा 31 ग्रामपंचायतीसाठी ओबीसीचे आरक्षण सोडत झाले.

'वडेट्टीवार राजीनामा द्या, महाराष्ट्राची माफी मागा'

यात यात 16 महिला ओबीसीसाठी राखीव करण्यात आल्या. शरणापुर,शेंद्राबंन, पंढरपूर, देमणी,गिरणेरा, पाचोड, माळीवाडा, गोलवाडी, भिंदोन, खोडेगाव, तिसगाव,भालगाव, निपाणी, नायगव्हाण, चांदखेडा, आडगाव सरक यांचा समावेश आहे. उर्वरित obc पुरुषांसाठी सोडत झाली. 

सर्वसाधारण 60 पैकी तीस महिलांसाठी आरक्षण सोडण्यात आले. यात सेलूद, चारण, मुरुमंखेड, चिते पिंपळगाव, पिरवाडी, लायगाव, जडगाव, सटाणा, आमखेडा, एकोड, गेवराई ग्रूप ब्रॉड, बनगाव, कारोळ,शेवगा, लाडगाव, दुधड, रावरसपुरा, चितेगाव, जळगाव पेरण, शेंद्रा कामंगर, राहाळपट्टी तांडा, गाढेजळगाव, शेक्टा, ढवळापुरी, करोडी, जोडवाडी, पिंपरी खुर्द,बाळापुर, घारेगाव पिंपरी, कृष्णापुर वाडी, या ग्रामपंचात महिलासाठी आरक्षित करण्यात आले आहे तर उर्वररीत 30 ग्रामपंचायत या पुरुषांसाठी आरक्षण सुटले आहे.

यात  घारदोन तांडा, वरझडी, दौलताबाद, करमाड, बावडा, पोखरी, मांडकी, कोनेवाडी, सिदोन,महाल पिंपरी, वरुड, वडखा, गेवराई कुबेर, सताळा, कोरघर, सावंगी, रायगव्हाण, पिंपळगाव, मोहेरा, शेवगाव तांडा,  अंबदी मंडी, पिसादेवी, जोडगाव जालना, आडगाव गावली, अंजन डोह, वाहेगाव, परधरी, काद्राबाद, गांधेली या ग्रामपंचायत पुरुषांसाठी आरक्षित करण्यात आले आहे.

मराठवाड्याचं सौंदर्य; बीड, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळे

या आरक्षण सोडतीत s.d.m. रामेश्वर रोडगे,तहसीलदार शंकर लाड, नायब तहसीलदार प्रभाकर मुंडे, रेवनाथ ताठे, सारिका कदम, आनंद बोबडे, योगिता खटावकर, अव्वल कारकून रामेश्वर लोखंडे,रतनसिंग काळोक, संतोष साठे, नितीन चव्हाण काम पाहत आहेत.