
विद्यार्थ्यांकडून कोरोना नियमांचे पालन करुन घेताना शिक्षकांची कसरत
औरंगाबाद: २७ जानेवारीपासून राज्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. यात कोरोना नियमांचे विद्यार्थ्यांनी पालन करणे आवश्यक आहे. त्यासाठी मात्र शिक्षकांना कसरत करावी लागत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे टप्प्याटप्याने राज्यातील शाळा सुरु करण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाले. त्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यात आले आहे. तब्बल दहा महिन्यानंतर शाळा सुरु झाल्यामुळे दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत आहे. शाळा सुरु करण्यासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे.
काय म्हणावं अशा दैवाला ! विराजच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदान, दवाखान्यात...
या नियमानुसार मुलांना मास्क, सॅनिटायझर बाळगणे अनिवार्य केले आहे. तसेच शाळेत येताना जेवणाचा डबा न आणण्यास सांगीतले आहे. मात्र, पाचवी आणि सहावीचे विद्यार्थी या नियमामुळे वैतागले आहेत. अनेक वेळा मुले मास्क काढून टाकतात. मास्कमुळे जीव गुदमरतोय, मास्कच्या दोरीमुळे कानाला त्रास होतो असे सांगतात.
तसेच शासनाने फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत, मात्र तब्बल दहा महिन्यानंतर शाळा सुरु झाल्याने आपल्या मित्रांसोबत एकाच बेंचवर बसण्याचा हट्टही विद्यार्थी करतात. भूक लागली आहे उद्यापासून जेवणाचा डब्बा आणू का? अशी विचारणाही काही विद्यार्थी करतात. शासनाने पाचवी, सहावीच्या विद्यार्थ्यांना जेवणाचा डब्बा आणण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शिक्षकांकडून केली जात आहे.
वाळूज येथील भाजी मंडई हटवण्यावरून भाजप आक्रमक; आंदोलकांना पोलिसांनी घेतले...
विद्यार्थ्यांसाठी नियम-
शाळेत येताना प्रत्येक विद्यार्थ्याला मास्कचा वापर करणे, सोबत सॅनिटायझर बाळगणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे पालन करण्यासाठी शिक्षकांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे शिक्षक रामदास वाघमारे यांनी सांगीतले.
(edited by- pramod sarawale)