esakal | ग्रामीण भागातील शाळा २० मार्चपर्यंत बंद; १०वी व १२ वीच्या वर्गांना मात्र परवानगी

बोलून बातमी शोधा

Aurangabad Latest News}

इयत्ता १०वी व १२वी वर्ग सोडून इतर वर्गातील शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती अनिवार्य राहणार असून १०० टक्के उपस्थितीबाबत शाळांनी आग्रह धरू नये असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील शाळा २० मार्चपर्यंत बंद; १०वी व १२ वीच्या वर्गांना मात्र परवानगी
sakal_logo
By
सुनील इंगळे

औरंगाबाद : शहराप्रमाणेच ग्रामीण भागातदेखील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे इयत्ता ५वी ते ११वी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी दिले आहेत. यातून इयत्ता १०वी व १२वीच्या वर्गांना मात्र वगळण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक साथरोग कायद्यांतर्गत हे आदेश देण्यात आले आहेत. यानुसार, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळा २० मार्च पर्यंत बंद राहतील. मात्र ऑनलाईन वर्ग पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील.

हेही वाचा - वयाच्या चाळीशीत चोरी गेलेले सोने मिळाले २२ वर्षानंतर, शकुंतलाबाईंची चोरीला गेलेल्या अडीच ग्रॅम सोन्याची कहाणी

इयत्ता १०वी व १२वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांची दररोज थर्मल गन व ऑक्सिमीटरने तपासणी करून विदयार्थ्यांची नोंद ठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व शिक्षकांना दर आठवड्याला आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहील. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीपैकी कोणी पॉझिटिव्ह आढळल्यास सदरील शैक्षणिक आस्थापना चार दिवस बंद राहील. यानंतर सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणीनंतर ती निगेटिव्ह आल्यासच शाळा सुरु करण्यात येईल. इयत्ता १०वी व १२वी च्या वर्गासाठी कोव्हीड १९ अनुषंगाने शासनआदेशांचे पालन करणे बंधनकारक राहील.

हेही वाचा - Ease of Living Index 2020: देशात औरंगाबाद राहणीमान सुलभतेत ३४ तर जीवन गुणवत्तेत १३ व्या स्थानी


शिक्षकांना १०० टक्के उपस्थितीसाठी आग्रह नको
इयत्ता १०वी व १२वी वर्ग सोडून इतर वर्गातील शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती अनिवार्य राहणार असून १०० टक्के उपस्थितीबाबत शाळांनी आग्रह धरू नये असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, शाळा सॅनिटायझिंग करणे या आदेशांचे प्रकर्षाने पालन करण्याबाबत आदेशात नमूद आहे.

संपादन - गणेश पिटेकर