esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Latest News Farmer Suicide

जळगाव घाट येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक भाऊ, दोन मुली असा परिवार आहे.

बळीराजाची व्यथा! नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन केली आत्महत्या

sakal_logo
By
वाल्मिक पवार

चापानेर (जि.औरंगाबाद) : जळगाव घाट (ता.कन्नड) येथील तरुण शेतकरी दादाराव पुंजाबा शिरसाठ यांनी सततच्या नापिकीला कंटाळून राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता.१३) रात्री बारावाजेच्या सुमारास घडली.
दादाराव यांनी विषारी औषध घेतल्याचे त्यांच्या पत्नीच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सासूबाई व दीर यांना सांगितले.

त्यानंतर त्यांनी लगेच गाडी बोलावून औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी दादाराव शिरसाठ यांना तपासून मृत घोषित केले. त्यानंतर रविवारी (ता.१४) सकाळी दहा वाजता घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आणि जळगाव घाट येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक भाऊ, दोन मुली असा परिवार आहे.

संपादन - गणेश पिटेकर

go to top