
कोरोना संसर्गाची दुसरी लाट जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात येऊ शकते, असा इशारा देत सतर्क राहण्याचे आदेश राज्य शासनाने महापालिकेला दिले आहेत.
औरंगाबाद : कोरोना संसर्गाची दुसरी लाट जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात येऊ शकते, असा इशारा देत सतर्क राहण्याचे आदेश राज्य शासनाने महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार प्रशासन सज्ज असून, आवश्यक सुविधा, मनुष्यबळ, औषधी आणि चाचणी किट उपलब्ध असल्याचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी (ता. २४) सांगितले.
पत्रकारांसोबत बोलताना श्री. पांडेय पुढे म्हणाले, की कोविड केअर सेंटर्समध्ये सुमारे चार हजार बेड्सची व्यवस्था आहे. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दोन हजार बेड्सची व्यवस्था आहे.
Corona Update : आणखी १४६ जण कोरोनाबाधित, औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४० हजार ७०७ रुग्ण बरे
वैद्यकीय सेवेसाठी डॉक्टर्स, स्टाफ नर्स, वॉर्ड बॉय यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात ५४४ आयसीयू बेड्स आहेत, त्यापैकी सध्या ५२३ बेड्स रिकामे आहेत. २०९ व्हेंटिलेटर्स उपलब्ध असून, १९९ व्हेंटिलेटर्सचा सध्या उपयोग होत नाही. १७५५ ऑक्सिजन बेड्स आहेत, त्यापैकी १७०७ बेड्स रिकामे आहेत. जिल्हाभरात कोविड केअर सेंटर्समध्ये सहा हजार ७०४ बेड्स आहेत. त्यांच्यापैकी ६७४४ बेड्स रिकामे आहेत. औषधी, ऑक्सिजन पुरेसा आहे. २६ हजार ४७० पीपीई किट्स, ६८ हजार एन-९५ मास्क उपलब्ध आहेत, असे श्री. पांडेय यांनी सांगितले.
Edited - Ganesh Pitekar