Aurangabad Lockdown: कडक लॉकडाउनमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त; चौकाचौकात असणार खडा पहारा

police in lockdown aurangabad
police in lockdown aurangabad
Updated on

औरंगाबाद: शहरात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता मंगळवार (ता.३१) रात्रीपासून कडक लॉकडाउन करण्यात येणार आहे. हे लॉकडाउन ९ एप्रिलपर्यंत असणार आहे.  यासंदर्भात आदेशही जारी करण्यात आले असून यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. चौकाचौकांसह गल्लोगल्लीही पोलिसांच्या टू मोबाईल, पीटर वाहनांची पेट्रोलिंग तसेच १६ पोलिस ठाणेंतर्गत ठराविक चौकात पोलिसांचा खडा पहारा असणार आहे. पोलिसांच्या मदतीला होमगार्डही असतील.

प्रामुख्याने शहरातील सिटी चौक आणि जिन्सी पोलिस ठाण्यांतर्गत तब्बल ७ चौकांमध्ये नाकाबंदी असणार आहे. सिटी चौक ठाण्याअंतर्गत अण्णा भाऊ साठे चौक, शहागंज चमन, चेलीपूरा चौक, गणेश कॉलनी, बुढीलेन, हिंदी विद्यालय शहागंज आणि उद्धराव पाटील चौक या सात चौकात नाकाबंदी असणार आहे. तर जिन्सी ठाण्यांर्गत सेव्हन हिल, रोशन गेट, आझाद चौक, चंपा चौक, कटकट गेट, सेंट्रल नाका या सहा ठिकाणी नाकाबंदी असेल. विशेष म्हणजे बंदोबस्तादरम्यान पोलिसांनीही स्वतःची योग्य ती काळजी घेण्याचे पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी आदेशात म्हटले आहे.

Coronavirus:औरंगाबादमध्ये पाच हजार रुग्ण होम आयसोलेशन
 
फिक्स पॉईंटवर नाकाबंदीदरम्यान वाहनधारकांची चौकशी करुन पडताळणी करुन जर विनाकारण फिरताना आढळल्यास थेट गुन्हे दाखल होऊन दंड वसूल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आवश्‍यक सेवा म्हणून पुरविण्यात आलेल्या पासेस, ओळखपत्र असतील तरच रस्‍त्यावर उतरण्यास परवानगी असेल, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. 

पोलिस दलाची पोलिस ठाण्याच्या मोबाईल पेट्रोलिंगमध्ये प्रत्येक ठाण्यानिहाय (१७ ठाणे) दिवसपाळी आणि रात्रपाळीला १ अधिकारी आणि ३ अंमलदार असे चार जण असतील. याशिवाय विशेष शाखा, सुरक्षा शाखा, गुन्हे शाखेचे २ पथके, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर ठाण्याचे दोन पथके, महिला तक्रार निवारण कक्ष, पैरवी अधिकारी, मुख्यालयातील वाचक शाखा आदींची पथके बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली असून विविध ठाण्यांच्या हद्दीत पीसीआर पेट्रोलिंगची नऊ पथके तर दुचाकींची १७ पथके (ठाणेनिहाय) असणार आहेत. 

भाजीमंडीत गर्दी कराल तर..... 
पोलिस विभागातर्फे भाजीमंडीतील होणारी गर्दी लक्षात घेत चार पथके तैनात करण्यात आली आहेत. बेगमपूरा ठाण्यांतर्गत जटवाडाची टी भाजीमंडी, सिडकोअंतर्गत जाधववाडी भाजी मार्केट, पुंडलिकनगरांर्गत गजानन महाराज मंदिरासमोरील भाजी मार्केट आणि एम वाळूजच्या ओॲसिस भाजी मार्केट या चार ठिकाणी उपनिरीक्षकासह चार अंमलदाराची चार पथके असतील. 

२६९ होमगार्डचीही मदत- 
लॉकडाउनदरम्यान आयुक्तालय हद्दीतील नियंत्रण कक्षासह १८ ठाण्याअंतर्गत तब्बल २६९ होमगार्ड असणार आहेत. यामध्ये २४५ पुरुष होमगार्ड तर २४ महिला होमगार्ड असतील. प्रामुख्याने मोठा आवाका असलेल्या सिटीचौक आणि मुकूंदवाडी ठाण्यांर्गत प्रत्येकी २४ होमगार्ड, क्रातींचौक २४, जिन्सी २२ होमगार्ड असतील. विशेष म्हणजे दिवसपाळी आणि रात्रपाळीदरम्यान केलेल्या कारवाईचा अहवाल गुन्हे शाखा, नियंत्रण कक्षाला संबंधितांना कळवावा लागणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com