औरंगाबाद महापालिका निवडणूक 2020 : नवीन रचनेत चेहराच बदलला 

औरंगाबाद महापालिका निवडणूक 2020 : नवीन रचनेत चेहराच बदलला 

इंदिरानगर-बायजीपुरा पश्‍चिम : वॉर्ड क्र. 58 

मागील निवडणुकीत 58 क्रमांकाचा वॉर्ड बारी कॉलनी होता; मात्र नवीन रचनेत हा वॉर्ड इंदिरानगर-बायजीपुरा पश्‍चिम असा झाला आहे. हा वॉर्ड मुस्लिमबहुल असून, येथे अनुसूचित जातीसाठी आरक्षण पडले आहे. या वॉर्डाला इंदिरानगर, बायजीपुरा भाग, संजयनगर भाग जोडले आहेत. वॉर्ड आरक्षित झाल्याने येथील राजकीय स्पर्धा कमी झाली आहे.

हेही वाचा : वाचा... चिमुकल्या रोशनीची हृदयस्पर्शी कहाणी - video

अशी आहे रचना 

उत्तर दिशेला : यास्मीन क्‍लिनिक ते गंजेशहिदा कब्रस्तानची दक्षिण भिंतमार्गे शेख सलीम यांचे घर ते गंजेशहिदा गल्ली नंबर सीसी 16 ते मार्क इंटेरियर ते मुसा चौक मुख्य रस्त्याने जनसेवा दूध डेअरी मार्गे संजीवनी मेडिकल ते दिलकश डेअरी गल्ली नंबर 30 ते मुद्दसीर लायसन्स वर्कपर्यंत. पूर्वेला गल्ली नंबर 30 येथील मुद्दसीर लायसन्स वर्क ते सरसय्यद मराठी प्राथमिक शाळा ते अहेमद हुसेन यांचे घर गल्ली नंबर 30 मार्गे अपना किराणा स्टोअर ते न्यू बालाजी प्रोव्हिजन्स ते सलीमभाई यांचे घरापर्यंत.

दक्षिणेला : सलीमभाई यांचे घर ते बसैये बंधू यांची कपाऊंडवॉलमार्गे रोशन सोनेग्राफी ते शिफा क्‍लिनिक ते पुष्पा मेडिकोमार्गे साहेम डायगोनोस्टिक सेंटर ते के. के. पॅलेसजवळील टी जंक्‍शनपर्यंत. पश्‍चिमेला के. के. पॅलेसजवळील टी जंक्‍शन ते तव्वकल किराणा ते गल्ली नं. सी 10 मार्गे हब्बीबुन्निसा मशीदपर्यंत ते उत्तरेकडे रोनक कलेक्‍शनमार्गे न्यू गुडलक प्रोव्हिजन जे डायमंड आर्ट डेकोरेटर्स ते यास्मीन क्‍लिनिकपर्यंत. 

असा आहे वॉर्ड 

लोकसंख्या : 9708 
अनुसूचित जाती : 916 
अनुसूचित जमाती : 48 


या वॉर्डात पाणी लवकर येत नाही. कित्येक वेळा तर नळाला ड्रेनेजचे पाणी येत असते. त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्‍यात येते. वॉर्डात धोकादायक तारासुद्धा आहेत. 
-शेख मुजफ्फर 

या वॉर्डाला इंदिरानगर, बाजयीपुरा, संजयनगर असे तीन भाग जोडले गेले आहेत. त्यामुळे विकासकामांवर परिणाम होतो. कुठल्या कुठे वॉर्ड तुटलेले दिसतात. त्यामुळे विकासकामे रखडतात. 
-अफरोज पठाण 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com