औरंगाबाद महापालिका निवडणूक 2020 : विष्णुनगरचं फक्त नावच राहिलं

अनिल जमधडे
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

औरंगाबाद : विष्णुनगर वॉर्डाच्या सीमा पूर्णपणे अन्य तीन वॉर्डांत बदलून मूळ वॉर्ड अस्तित्वहीन करण्याचे काम नव्या रचनेने केले. यामुळे विष्णूनगर वॉर्डाचे केवळ नावच कायम राहिले आहे. 

विष्णुनगर (वॉर्ड क्र. 72) सर्वसाधारण महिला) या मूळ वॉर्डाचा वीस टक्के भाग जवाहर कॉलनी-भानुदासनगरला जोडला. 40 टक्के भाग उत्तमनगर, बौद्धनगर वॉर्डाला जोडण्यात आला. उरलेला भाग रमानगर वॉर्डाला जोडण्यात आला. यामुळे विष्णुनगर वॉर्डात केवळ एक गल्ली उरली आहे. 

गंभीरच : धोकादायक शिवशाही  

अशा आहेत सीमा : उत्तर दिशेला : मगरे यांच्या घरापासून ते कर्मवीर शंकरसिंग नाईक शाळेपर्यंत, पारस कासलीवाल यांचे घर ते आनंद इलेक्‍ट्रिकल, बालाजी मंगल कार्यालय. पूर्व दिशेला : पंचशीलनगर, खेडकर यांच्या घरापासून ते मारुती मंदिर, अरिहंतनगर चौक ते जसोरिया यांच्या घरासमोरील रस्ता, देविदास कोळी, शिवशंकर कॉलनी ते मिलिंद खडसे यांचे घर.

रेल्वेचा मराठवाड्याला  पुन्हा "बाय बाय' 

 दक्षिण दिशेला : बालाजी हॉट चिप्स बौद्धनगरमार्गे सायली हॉटेल चौक ते चेतक घोडा चौक ते एसबीआय बॅंकेसमोरील रस्त्याने गुरुकुल क्‍लासेस. 
पश्‍चिम दिशेला : न्यू बालाजीनगर, छत्रे यांचे घर ते भदाने यांच्या घरापासून ते युसूफ शेख, सौजन्यनगर यांचे घर ते महुनगर प्लॉट ते मगरे यांच्या घरापर्यंत. 

येळकोट : लैंगिकतेची "बोल्ड' चर्चा  

असा आहे वॉर्ड 

लोकसंख्या : 11,377 
अनुसूचित जाती : 2508 
अनुसूचित जमाती : 112 

विष्णुनगर वॉर्ड तीन भागांत विभागण्यात आला. नियमबाह्य पद्धतीने सीमा बदलण्यात आल्या. वॉर्डरचनेत सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले. 
- डी. एम. देशपांडे 

विष्णुनगर वॉर्डाच्या रचना बदलून मूळ मतदारांवर अन्याय करण्यात आला. विष्णुनगर वॉर्डाचे केवळ नाव शिल्लक राहिले आहे. 
- सागर कुरे पाटील 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Election 2020 Vishnunagar Ward