कशामुळे भरतेय महापालिकेची तिजोरी वाचा...

माधव इतबारे
रविवार, 29 डिसेंबर 2019

औरंगाबाद-महापालिकेच्या तिजोरीतील खडखडाट हळूहळू संपत आहे. नवे आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी वसुलीकडे विशेष लक्ष दिल्यानंतर महापालिकेची भरभराट सुरू झाली असून, कधी-कधी मायनसमध्ये जाणाऱ्या महापालिकेच्या बॅंक खात्यात तब्बल चार कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

औरंगाबाद-महापालिकेच्या तिजोरीतील खडखडाट हळूहळू संपत आहे. नवे आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी वसुलीकडे विशेष लक्ष दिल्यानंतर महापालिकेची भरभराट सुरू झाली असून, कधी-कधी मायनसमध्ये जाणाऱ्या महापालिकेच्या बॅंक खात्यात तब्बल चार कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

खर्च अफाट आणि उत्पन्न कमी असल्यामुळे महापालिकेवरील आर्थिक संकट गेल्या काही वर्षांपासून गडद होत होते. कंत्राटदारांची देणी तब्बल अडीचशे ते तीनशे कोटींच्या घरात गेली होती. त्यामुळे कंत्राटदारांनी शहरातील विकासकामे बंद करून महापालिका मुख्यालयासमोर दोन ते अडीच महिने साखळी उपोषण केले. दररोजचा अत्यावश्‍यक खर्च 30 ते 35 लाखांच्या घरात असताना तिजोरीत मात्र 15 ते 20 लाख रुपये जमा होत होते; मात्र हे चित्र आता पालटले आहे.

हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे

नवे आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी पदभार घेतल्यानंतर वसुलीकडे विशेष लक्ष दिले. वसुली वाढवा, अन्यथा मला कारवाई करण्यासाठी भाग पाडू नका, अशी तंबीच त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. त्याचबरोबर शहरातील बेकायदा मोबाईल टॉवरकडे त्यांनी आपली मोहीम वळविली. टॉवरपोटी तब्बल 30 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे टॉवर किंवा टॉवर असलेल्या मालमत्तांनाच सील लावण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. तीन-चार दिवसांत महापालिकेने दीडशेपेक्षा अधिक टॉवर सील करून शहरातील मोबाईल नेटवर्क जाम करून टाकले.

त्यामुळे मोबाईल कंपन्यांनी महापालिकेकडे नऊ कोटी रुपयांचा कर भरला. तसेच मालमत्ता कराच्या वसुलीतही वाढ झाली आहे. त्यामुळे खडखडाट असलेल्या महापालिकेच्या तिजोरीला भरभराटीचे दिवस आले आहेत. अनेकवेळा महापालिकेचे खाते मायनसमध्ये जात होते. या खात्यात आता चार कोटी रुपये जमा असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal News