औरंगाबादेत वाघ, सिंह सफारीचा मार्ग मोकळा... 

Aurangabad amc news
Aurangabad amc news

औरंगाबाद : महापालिकेने मिटमिटा भागात सफारी पार्क विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेला डीपीआर केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने मंजुरी केला असून, पहिल्या टप्प्यातील कामाची लवकरच निविदा काढली जाणार असल्याचे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. दरम्यान सफारी पार्कसाठी शासनाने शंभर एकर जागा दिली आहे. त्यात आणखी ५० एकर जागेची भर पडणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सफारी पार्कचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे हे काम स्मार्ट सिटीच्या निधीतून करण्याचा निर्णय झाल्यानंतर मात्र सफरी पार्कच्या फाईलला गती मिळाली आहे. गतवर्षी महापालिकेने सफारी पार्कचा प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करून तो केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या डिझायनिंग कमिटीकडे मंजुरीसाठी सादर केला होता. मात्र त्यात काही त्रुटी काढण्यात आल्या होत्या.

या त्रुटी महापालिकेने नियुक्त केलेल्या दिल्लीच्या पीएमसीने दूर केल्या व केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या तांत्रिक समिती समोर सुधारित प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार डीपीआरला मंजुरी मिळाल्याने सफारी पार्कचे काम सुरू करण्यातील अडथळे दूर झाल्याचे श्री. पांडेय यांनी सांगितले. दरम्यान पहिल्या टप्प्यातील कामाची निविदा जूनच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. टायगर व लॉयन पार्कसाठी आणखी २० हेक्टर जागेची मागणी महापालिकेने केलेली आहे. त्यानुसार ५० एकर जागा महापालिकेला मिळण्याच्या मार्गावर असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

पहिल्या टप्प्यात संरक्षण भिंत 
राहून स्मार्ट सिटीतून १४५ कोटी रुपये खर्च करून सफारी पार्कचे काम केले जाणार आहे. त्यात टायगर व लॉयन पार्कसाठी आणखी २० कोटींची वाढ करण्यात आली. सफारी पार्कचे काम तीन टप्प्यात केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ५० कोटीची निविदा निघेल. त्यात प्रमुख काम म्हणजे शंभर एकर जागेला संरक्षण भिंत व अंतर्गत रस्त्यांचे काम असेल. त्यानंतर प्राण्यांसाठी पिंजरे, वृक्षारोपण, कार्यालयांचे बांधकाम अशी कामे केली जातील. 

शेतकऱ्यांनो...निंबोळी अर्क तयार करण्याची हीच खरी वेळ, विनाखर्च बनविण्याची ही आहे पद्धत

सफारी पार्कचे ठळक वैशिष्ट्ये 
६० प्रजातींचे ५०० प्राणी 
 ४० टक्के प्राणी मराठवाड्यातील 
 ४० टक्के प्राणी अन्य राज्यातील 
 १० टक्के प्राणी विदेशातील 
 ३७ प्रकारचे मासे अक्वेरियममध्ये 
 ८.५ एकर जागा हत्तींसाठी 
 ६ वर्षांत प्रमुख प्राण्यांचे पिंजरे करणार 
 सिद्धार्थमधील प्राण्यांचे स्थलांतर 
२.५ कोटी देखभाल दुरुस्तीसाठी खर्च 
४ कोटींचे वार्षिक उत्पन्न गृहित 
२० लाख पर्यटक वर्षात देतील भेट 
 २.५ एकर भागात नर्सरी असेल 
 ३.५ हेक्टर क्षेत्रात पार्किंग 
 २०० चार चाकी वाहनांची सोय 
 ३५० दुचाकी वाहने उभा राहणार 
 २० बसच्या पार्किंगची सुविधा 
 
हे असेल आकर्षण 
-पकडलेल्या बिबट्यांसाठी सुटका केंद्र 
- सर्व प्राण्यांसाठी खुले पिंजरे 
- पक्ष्यांसाठी बंदीस्त पिंजरे 
- प्राण्यांच्या पिंजऱ्याला काचेचा पडदा 
- ओपन थिएटरची व्यवस्था 
- फूड प्लाझा, मुलांसाठी स्वतंत्र पार्क 
- जलकुंभ, त्यावर टेहळणी मनोरा 
- प्राण्यांसाठी अद्ययावत रुग्णालय 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com