आता पाणीही घ्या माेजून

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 February 2020

नव्या योजनेत मीटरचा समावेश करण्यासंदर्भात नुकतीच पालकमंत्री व पर्यटनमंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे. त्यांनी मीटर बसविण्यासंदर्भात "ग्रीन सिग्नल' दिला आहे. त्यामुळे नव्या योजनेत मीटरचा समावेश केला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. 

औरंगाबाद-राज्य शासनाने मंजूर केलेल्या 1,680 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेत आता नळांना मीटर बसविण्याचा समावेश केला जाणार आहे. पालकमंत्री सुभाष देसाई, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत याबाबत नुकतीच चर्चा झाली असून, त्यांनी "ग्रीन सिग्नल' दिल्याची माहिती आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सोमवारी (ता. 17) दिली. 

राज्य शासनाने शहरासाठी 1,680 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सध्या पहिल्या टप्प्यातील 1,308 कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. चारपैकी दोन निविदा पात्र ठरल्याने फायनान्सियल बिड तपासण्याचे सध्या काम सुरू आहे. जीवन प्राधिकरणाच्या नियमानुसार तीन निविदा प्राप्त होणे गरजेचे आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमांनुसार तिसऱ्यावेळी दोन निविदा आल्या तरी त्या ग्राह्य धरता येऊ शकतात. या योजनेकडे पालकमंत्री सुभाष देसाई यांचे वैयक्तिक लक्ष असून, जीवन प्राधिकरणाने निविदेसंदर्भातील अहवाल वरिष्ठांकडे पाठविल्याचे आयुक्तांनी सांगितले. सध्या शहरात नळांना मीटर नसल्यामुळे कमी पाणी वापरणाऱ्याला व जास्त पाणी वापरणाऱ्याला तेवढेच बिल मोजावे लागत आहे.

क्लिक करा : मंदी संपताच बजाज ऑटोचा होणार विस्तार

त्यामुळे नळांना मीटर बसविल्यास नागरिकांना पाण्याच्या वापरानुसार बिल द्यावे लागेल. त्यात कमी पाणी वापरणाऱ्याचा फायदा होणार आहे. नव्या योजनेत मीटरचा समावेश करण्यासंदर्भात नुकतीच पालकमंत्री व पर्यटनमंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे. त्यांनी मीटर बसविण्यासंदर्भात "ग्रीन सिग्नल' दिला आहे. त्यामुळे नव्या योजनेत मीटरचा समावेश केला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. 

लवकरच फुटणार नारळ 
शहरातील बेकायदा नळांबाबत विचारणा केली असता, आगामी काळ उन्हाळ्याचा आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेत पाणी देण्याला महापालिकेचे प्राधान्य असेल. निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने योजनेच्या कामाचा लवकरच नारळ फुटेल, असे आयुक्तांनी नमूद केले. 

हेही वाचा : कोणाच्या"कृपे'ने औरंगाबाद शहराचा झाला कचरा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Water Supply News