Corona Update : कोरोनाबाधित रुग्णसंख्या पोचली ४६ हजाराच्या पुढे, ११५ जणांवर उपचार सुरु

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 27 January 2021

आजपर्यंत ४५ हजार ४६८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी (ता.२६) ३० जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४५ हजार ४६८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मंगळवारी एकूण २१ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४६ हजार ८१६ झाली आहे. आजपर्यंत एकूण १२३३ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ११५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने माहिती दिली आहे.  

औरंगाबादच्या बेगम यांची तब्बल १८ वर्षानंतर पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका; नातेवाईकांनी मानले पोलिसांचे आभार

शहरातील कोरोनाबाधित (कंसात रुग्ण संख्या) : जुना मोंढा (१), उल्का नगरी (१), एन वन सिडको (१), छावणी परिसर (१), मुकुंदवाडी (२), शिवशंकर कॉलनी (१), बीड बायपास (१), शिवाजी नगर (१), पुंडलिक नगर (२), हिंदी विद्यालय (१),चिकलठाणा (१), एन दोन सिडको (१), ओम गणेश नगरी (१), होनाजी नगर, हर्सुल (०१),सिडको (०१)
ग्रामीण भागात : (०४)

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू 
घाटीत फुलंब्री तालुक्यातील जातेगावातील ७५ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News Above 46 Thousand Corona Patient Numbers Crossed