आरोपीला अटक झाल्यानंतरच सुरु झाली औरंगाबादची सिटीबस सेवा

सचिन माने
Sunday, 24 January 2021

 रविवारी (ता.२४) सकाळी सहा वाजेच्या सुमारास सिडको बसस्थानकाच्या गेटजवळ रिक्षा चालकांनी रस्त्यात अडवून धरला होतो. 

औरंगाबाद : सिडको बसस्थानकाच्या आवारात सिटीबस चालकास मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकाच्या साथीदारास अटक करेपर्यंत बससेवा सुरु करणार नसल्याचा निर्णय सिटी बस चालकांनी घेतला. त्यानंतर मारहाण करणाऱ्या चौघांपैकी एकास सिडको एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतरच सिटीबस सुरु करण्यात आली.

OBC March: जालन्यात ओबीसींचा विराट मोर्चा; जानकर, बावनकुळेंसह महिलांचा लक्षणीय सहभाग

रविवारी (ता.२४) सकाळी सहा वाजेच्या सुमारास सिडको बसस्थानकाच्या गेटजवळ रिक्षा चालकांनी रस्त्यात अडवून धरला होतो. त्यावेळी सिटीबस घेऊन आलेल्या निवृत्ती वानखेडे या चालकांने  रिक्षाचालकास रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्यानंतर त्या रिक्षा चालकांने वानखेडे  यांना मारहाण केली.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

वानखेडेच्या मदतीला धावून आलेल्या सिटी बसच्या चालकालाही त्या रिक्षाचालक व त्यांच्या साथीदाराने मारहाण केली होती. या घटनेची माहिती तात्काळ सिडको एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. दरम्यान पोलिस येईपर्यंत रिक्षाचालक फरार झाला होता. जो पर्यत आरोपील अटक होत नाही तो पर्यंत सिटीबस सेवा सुरु होणार नसल्याचा पवित्रा चालकांनी घेतला होता. चालकांचे हे रुद्र रुप पाहून पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत त्या रिक्षा चालकांच्या मुसक्या आवळल्या. आरोपील अटक केले की, नाही याची शहानिशा स्वत: चालकांनी पोलिस ठाण्यात केली. त्यानंतर बससेवेस सुरवात केली. 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News City Bus Service Start After Accused Arrested