मुख्यमंत्री ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी औरंगाबादेत मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

ई सकाळ टीम
Friday, 5 February 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज शुक्रवारी (ता.पाच) औरंगाबादच्या दौऱ्यावर येत आहेत.

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज शुक्रवारी (ता.पाच) औरंगाबादच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज मुख्यमंत्र्यांचे वाहन अडविण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे शुक्रवारी शहर पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

शिवसेना नेते खैरेंवर पत्रके फेकली
क्रांती चौकात माजी खासदार तथा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचे वाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी (ता.चार) अडवून संभाजीनगरचे पत्रके त्यांच्यावर फेकण्यात आले आहे. या प्रसंगी शिवसेनेच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे,  शहराध्यक्ष सतनाम गुलाटी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मनसेने २६ जानेवारीचा अल्टिमेटम दिला होता. नाहीतर आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारही दिला होता. त्यामुळे जानेवारी महिन्यात राज्यात ठिकठिकाणी पक्षातर्फे आंदोलने करण्यात आले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News Before CM Thackeray Visits Police Action Against MNS Workers